पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२

ज्ञानाचे कोठार असे ज्याचें मन झालें आहे; ज्याची कल्पना- शक्ति ह्मणजे शुद्ध व सुंदर वस्तूंचा चित्रमहाल; ज्याचें वर्तन सदसद्विवेकबुद्धीशीं मिळून आहे; ज्याला ईश्वराची भीति नहीं, किंवा जगाची भीति नाहीं; ज्याचा आत्मा परमात्म्याचें लीन होण्याचें देऊळ, अशा माणसास, मानवी प्राण्यास शक्य अस- लेली पूर्णता बहुतेक आली.”
 जॉन स्टुअर्ट मिल ह्मणतो- "स्वशिक्षणाची खरी पद्धतही होय. प्रत्येक गोष्टीबद्दल खोदखोदून प्रश्न करणें; अडचण आली तरी माघार न घेणें; कोणतेंही मत, मग तें स्वतःचें असो किंवा इतर कोणाचें असो, कडक तपासणी केल्याशिवाय व टीका केल्याशिवाय कबूल न करणें; अनुमान बसविण्यांत झा- लेल्या चुक्या, किंवा विचारांचा गोंधळ, ह्यांची बारकाईनें चौकशी केल्याशिवाय त्या तशाच सोडून न देणें; सर्वात विशेष महत्वाचें, कोणताही शब्द पूर्णपणें कळल्याशिवाय न वापरणें; एकाद्या विधानाचा अर्थ कळल्याशिवाय त्याला अनुमोदन न देणें." हे सर्व धडे आपणांस शिकतां येतील.
 शिक्षणक्रमाच्या प्रथम चरणीं तरी सर्वांस एकच मालिकेंत रहातां येईल. ह्या ठिकाणीं संपत्ति व उच्च कुळ ह्यांचा ह्मणण्याजोगा उपयोग होत नाहीं. सर डब्ल्यू. जोन्स स्वतःविषयीं ह्मणतो- “ए- काद्या शेतकऱ्याजवळ पैसे असतात तेवढे पैसे असूनही, मीं राजाला जें शिक्षण मिळतें तें मिळविलें. फार दिवसांपासून शिकण्यास राजमार्गच नाहीं असें लोक सांगत आले आहेत; परंतु शिक- ण्याचे सर्व मार्ग राजमार्गच आहेत असें ह्मणणें कदाचित् जास्त खरें असेल; व अंतीं मिळणारें बक्षिस किती मोठें ! शिक्षणाच्या योगें जगाचा इतिहास प्रकाशित होतो, व सुधारणेचा मार्ग उज्ज्वलित होतो. सर्व जगांतील ज्ञानाचें महत्व आपणांस त्यामुळे