पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्तन असले तर त्या वर्तनानुरूप आपल्यास दुःख सोसावें लागणारच. धैर्य अतिशय असलें ह्मणजे माणूस उफराट्या काळजाचा होतो. फाजील प्रेम हैं एक प्रकारचें व्यंगच होय. अति काटकसर ह्मणजे धनतृष्णा. जें एका माणसास पोसतें तें दुसऱ्यास विष जाचतें ही एक ह्मणच पडून गेली आहे. सृष्टीच्या नियमांत अमुक फेरफार केला तर माणसास जास्त सुख होईल असें अद्यापि कोणीं सिद्ध करून दाखविलें नाहीं. मनुष्य पडलें ह्मणजे त्याचा पाय मोडतो हें खरें आहे, पण गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत कोणता ही फेरफार केला तर फायदा होणार नाहीं.

 सुखाधिकारी दूत आर्मझ व दुःखाधिकारी दूत आहरीम ह्यांकडे सुखदुःखाच्या वांटणीचें काम आहे असें इराणी लोक मानितात. पण खरें पाहिलें असतां ह्या जगांतील दुःखें आपल्या प्रमादामुळें आपण आपल्यावर ओढवून घेतों. प्रमाद हा शब्द द्यर्थक आहे. अमुक गोष्ट वाईट आहे असें आपणांस माहीत असतांना ती करणें, अथवा अजाणतेपणामुळे चुक्या घडणें. ह्या दोन्हींमुळे माणूस सारखींच संकटें ओढवून घेतो. पहिल्या वर्गी- तील प्रमाद टाळण्याविषयीं ह्मणाल तर कधीं न चुकणारा मार्गप्रदर्शक ईश्वरानें आपल्या हृदयांत स्थापलेला आहे. ह्मणून आपल्या हातून वाईट झालें तर तें जाणून बुजून आपण केलें असें झटलें पाहिजे. कारण जाणून बुजून वाईट केलें नसलें, किंवा तें करि तांना मुद्दाम डोळ्यावर कातडें ओढून घेतलेले नसलें, तर आपल्या हातून वेडगळपणाचें वर्तन घडलें असें मात्र होईल. पाप घडलें असें कदापि होणार नाहीं.

 दुसऱ्या वर्गातील प्रमाद टाळण्यास आपणांस आपल्या विचारशक्तीवर सर्वस्वीं अवलंबून राहिलें पाहिजे; किंवा आपले आईबाप, वाडवडील अथवा मित्रमंडळी यांचा विचार व