पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००


ह्मणून चांगल्या विचारांशी आणि उदात्त भावनांशी नेहमी आपला संबंध असावा, हें फार महत्वाचें आहे."
 माणसाचा मेंदू विचाराचें गृह व आत्म्याचा राजवाडा असावा. डॉन ह्मणतो – “ह्या देहरूपी क्षेत्राचे आपण शेतकरी आहोंत. दाणा वगैरे शिलकेस राखून ठेविला, व भरभराटी आलों, तर भाडे देण्याच्या शेवटच्या दिवसासाठीं आपणांस बराच ऐवज ठेवितां येईल." प्रत्यक्षवादी लोकांच्या मतांत मला बरेंच ग्राह्य नाहीं; पण त्यांचा मुद्रालेख फार उदात्त आहे :- "भूतदया हा जीवनहेतु, शिस्त हा पाया, व उन्नति हा साध्य हेतु . "
 तथापि एमर्सन ह्मणतो- " वाडवडिलांच्या परिपाठाप्रमाणें पु- ष्कळ साधे लोक ईश्वराची भक्ति करितात; परंतु आपल्या सर्व शक्तींचा उपयोग केला पाहिजे, येथपर्यंत त्यांच्या कर्तव्यकर्मा- विषयींच्या कल्पनेची मजल आली नाहीं."
 माणूस आपणावरून जग मोजितो. मोठमोठ्या पर्वतांची उंची व समुद्राची खोली ह्याचें माप फुटांवर ठरवितो; गणित- शास्त्रांतही संख्येची मोजणी आपल्या बोटांच्या संख्येवर अवलंबून असते. असें असून आपण किती क्षुल्लक प्राणी आहोंत ! आपण अगदी क्षुल्लक असून आपणांस किती मोठें होतां येईल. मनुष्य- प्राणी काय करील ? आणि काय करणार नाहीं ?
 पॅस्कल ह्मणतो- “मनुष्यप्राणी ज्ञेय, अज्ञेय, विधि, निषेध, नानाविध अज्ञान, वासना, प्रतिसारकत्व, कल्पनाशक्ति आणि मनो- विकार इत्यादींचें एक कडबोळें होय." आणखी एका ठिकाणी तोच ह्मणतो – “मनुष्यप्राणी ह्मणजे कः पदार्थ ! विश्वांत अति निर्बल वस्तु मनुष्य. मनुष्य कः पदार्थ, पण विचार करणारा पदार्थ. सर्व सृष्टि त्याला चिरडून टाकण्यास