पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९९

शास्त्रे, तत्त्वज्ञान, काव्य, शास्त्राध्ययन ह्यांचीं सूत्रे ज्या ज्या ग्रंथ- कारांकडे आहेत, ते ग्रंथकार ह्या पवित्र शिडीवरून वर खालीं जाणारे देवदूत होत; व हे जणूं पृथ्वी व स्वर्ग ह्यांच्या दरम्यान दळणवळण ठेवितात.”
 किती उदाहरणांत शोधांचे शोधक माहीत नाहींत ह्याचें स्मरण झालें ह्मणजे वाईट वाटतें. आपणास जें वाईट वाटतें तें त्यांच्या करितां नव्हे, तर त्यांची आठवण करून कृतज्ञता प्रकट करण्याची आपली इच्छा असते ह्मणून. मोठमोठ्या शोधकांनी जे अपरिमित श्रम केले ते स्वतःकरितां किंवा कीर्ति मिळविण्या- करितां नव्हत.
 कधीं न थकतां कधीं न भागतां त्यांनीं सत्य शोधून काढण्याचा यत्न केला. आनंदरहित मार्गानें त्यांना जावें लागलें, कोणी दोत वा निंदोत ह्या बुद्धीनें त्यांनीं काम केलें, व बाकीचा भार त्यांनी देवावर टाकिला. जरी कवींनीं त्यांचीं नांवें अजरामर स्तोत्रमालेत किंवा कथानकांत गोविलीं नाहींत, तरी त्यांच्या कृत्यांचा खरडा वर लिहून ठेविला आहे. शाश्वत सुख हैं त्याच्या पुष्पमालेप्रमाणें झालें आहे.
 हें आयुष्य आनंदांत घालविण्यास अभ्यासाकडे लक्ष देणें व परिश्रम करणे जरूरीचें आहे. कामाकडे अर्धवट लक्ष दिलें तर काम करण्यास दुप्पट वेळ लागेल.

 मनुष्यप्राण्याच्या सुखांत मानसिक व्यवसायामुळे किती थोडी भर पडली आहे ह्याचा विचार केला ह्मणजे वाईट वाटतें. आणि खरें पाहिलें असतां शाळा ह्या शब्दाचा अर्थ ग्रीकभाषेंत विश्रांति किंवा सुख ह्यांची जागा असा होता. जे. मोर्लेसाहेब असें ह्मणतो - "सुख व्हावें ह्मणून किंवा कर्तव्य


  १ लाई बेकन्सफील्ड.