पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८


इतिहासांतल्या गोष्टी, गणितांतले सिद्धांत, व्याकरणाचे नियम, मधुर व गोड अशा कवितेच्या ओळी, किंवा शास्त्रांतील तत्वें, सारांश ज्या कांहीं गोष्टी आह्मी त्या वेळीं शिकलों त्यांपैकीं अशी कोण-तीही गोष्ट नाहीं कीं, जी कल्पनाही नसतां वारंवार ध्यानांत येऊन स्वप्नीं नसेल असा फायदा करून देत नाहीं. मी जीं पुस्तकें वाचितों, व आजकाल ज्या गोष्टी घडून येतात, त्या कळण्यास त्या सिंहावलोकनाचा उपयोग झाला आहे; व त्यामुळे हें संसारचित्र विशेष व्यापक व मनोरंजक वाटू लागले आहे. "
 शेवटला एक डीन स्टॅनलीचा उतारा देतों: - "निरपेक्ष- बुद्धीनें सत्याची आवड किती थोड्या ठिकाणीं आढळते. तरी पण ती किती उपयोगाची आहे! तिची किंमत आपणांस एकदम दिसून येत नाहीं. सत्याची एकनिष्ठपणें सेवा करण्याच्या उद्देशानें ज्या लोकांची मनें शास्त्रांकडे ओढली गेलीं,अशा शास्त्रज्ञांच्या शोधामुळे ह्या संसारातलें सुख किती वाढलें आहे त्याची किंमत ह्या पिढींत कदाचित् पुढच्या पिढींत- ही कळून येणार नौहीं.” शहाणे लोक श्रवण करितात, व ज्ञान वाढवितात असें सॉलोमन ह्मणतो ते बरोबर आहे.
 जिचा उपयोग होणार नाहीं अशी माहिती क्वचितच असेल. एक वेळ तरी पाहण्याजोगी नाहीं अशी वस्तुही क्वचित् आढळेल. खरोखर जगांत लहान वस्तु नाहीं, मन मात्र कोतें असतें. “पेत्रीआर्कच्या ( गोत्रजनक ) स्वप्नांत दिसलेल्या गुप्तार्थद्योतक शिडीप्रमाणें ज्ञानाची एक शिडी आहे. तिचें बुंद आदिकालच्या पृथ्वीवर आहे व शिखर अंतरालांतल्या अस्पष्ट सौंदर्यात गुर-

फटल्यामुळे दिसत नाहींसें झालें आहे. दंतकथेच्या युगापर्यंत


 १ स्टॅनलेचें चरित्र. २ प्राव्हर्ब्स.