पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७

 ज्ञानमार्गातल्या बऱ्याच पायऱ्या पूर्वी कुचकामाच्या वाटत होत्या त्या हल्लीं सर्वात महत्वाच्या ठरल्या आहेत. ज्ञान ही अ- तुल शक्ति होय. " तारायंत्रामुळे वेळ वांचतो; लेखनकलेमुळें मनुष्यवाणीचा उपयोग, व जाण्यायेण्याचा त्रास वांचतो; घरांतील टापटिपीच्या ज्ञानानें शिल्लक रहाते; आरोग्यशास्त्राच्या ज्ञानानें आरोग्य रहातें, व प्राण यांचतात; मानसिक श्रमनियमांच्या बनें मेंदूची झीज कमी होते. आत्म्याच्या नियमांच्या ज्ञानानें वाचत नाहीं असें कोणतें ?
 हर्बर्ट स्पेन्सर ह्मणतो - "प्रत्यक्ष आत्मसंरक्षणास, ह्मणजे आपल्या प्राणाचे व आरोग्याचे संरक्षणास, अत्यंत महत्वाचें ज्ञान शास्त्रज्ञान होय. त्याचप्रमाणें अप्रत्यक्ष आत्मसंरक्षणास ह्मणजे उपजीविकेस शास्त्रज्ञान अमोल आहे. घरांत वडील ह्या नात्यामुळे आपणां- कडे जीं कर्तव्यें येतात तीं बजावण्यास शास्त्रज्ञानाकडून खरी माहिती मिळते. प्राचीन काळीं राष्ट्रें कशीं चाललीं होतीं, अतः राष्ट्रें कशी चालतात, हें समजल्याशिवाय माणसास वर्तन कसें ठेवावें हें कळणार नाहीं; पण, हें कळण्याची गुरुकिल्ली शास्त्रज्ञानाकडे आहे. निरनिराळ्या कलाकौशल्याच्या अप्र- तिम वस्तु तयार करण्यास, त्या अप्रतिम आहेत असें कळण्यास, त्यापासून आनंद होण्यापुर्ती योग्यता अंगी येण्यास शास्त्रज्ञान हवें. मानसिकश्रम, नीति, धर्म इत्यादींच्या नियमानुरोधानें वागणें ज्याच्या दीर्घ अभ्यासाने शक्य होतें तें शास्त्रज्ञानच असें आणखी एकवार ह्मणावें लागतें. "
 डॉ॰ फिच ह्मणतो-“मी माझ्या आयुष्यक्रमाचें जेव्हां सिंहावलो- कन करितों व शाळेंत आणि कालेजांत घालविलेल्या फार जुन्या दिवसांविषयीं विचार करितों, तेव्हां माझी अशी खात्री होते कीं,