पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६


 शहाणपण हें मुख्य आहे तेव्हां तें मिळवा. इतर सर्व मिळवा पण आधीं आकलनशक्ति मिळवा.
 ज्ञान शहाणपणापेक्षां कमी योग्यतेचें आहे हें खरें पण त्याला बऱ्याच उदाहरणांत मिळावा तितकाही मान मिळत नाहीं. उदाहरणार्थ, आपणांस असें सांगतातः - ज्ञानसंपन्न माणसास आपल्या ज्ञानाबद्दल गर्व चढतो, पण शहाण्याच्या अंगीं आप- णांस कांहीं येत नाहीं ह्मणून नम्रता असते.
 परंतु हें खरें नाहीं. ज्यांना जास्त ज्ञान असतें त्यांना आ- पलें ज्ञान किती थोडें आहे हें कळणें अधिक शक्य आहे.
 बिशप बटलर देखील म्हणतो -- “शोधक व कल्पक लोकांस ते जे शोध करीत असतात त्यांबद्दल भलत्याच आढ्यतेच्या कल्पना मनांत न बाळगण्याविषयीं सूचना द्यावी. सद्गुण व धर्म माणसास हवे आहेत ह्याबद्दल साधक प्रमाणें, व धर्मानें कां गावें त्याची कारणें, व त्यांचा प्रसार करणें इत्यादींस मदत होऊन जर सद्गुण व धर्म ह्यांची सेवा होत असली, अथवा संसार जास्त सुखावह होत असला, किंवा ऐहिक सुखांच्या गोष्टींस भर पडत असली तर नवीन शोध लावण्यांत घाल- विलेल्या वेळाचें चीज झालें. नुसत्या नवीन गोष्टी उघड- कीस आणणें ह्यापासून मनोरजनापलीकडे दुसरा फायदा नाहीं. - ज्ञान निरुपयोगी कच्च्या मालमसाल्याप्रमाणें आहे; व त्या मालमसाल्यांतून निवड करून शहाणपण आपलें घर बांधितें हें ज्ञानाविषयीं ह्नटलें आहे तें अन्यायाचें आहे.
 जो शिल्पकार सामान निवडून काढण्यांत हलगर्जीपणा दाख- वितो तो कच्चा ह्मटला पाहिजे. आणि नव्या नव्या वस्तु दृष्टोत्पत्तीस आणण्याचा काय परिणाम होईल हेंही कोणास सांगतां येत नाहीं.