पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५

मनुष्य आपल्या मार्गाच्या बाहेर बराच लांब चालत जाईल. पण हे सोन्याच्या किंमतीचे शब्द प्राचीन काळच्या शहाण्या लोकांनी बोलून ठेवलेले येथें आहेत; व त्याची किंमत, मागून आलेल्या पि- ढ्यांतील सर्व शहाण्या लोकांनीं, मोठी सांगून ठेविली आहे."
 "जर तरुण माणसांस शिकतां येतें तर ह्यातान्यांस आलें पाहिजे" अशी एक औदासीन्यप्रदर्शक ह्मण फ्रेंच भाषेत आहे. व सुशिक्षण प्राप्त झाल्यास अवश्य असणाऱ्या दोन्ही गोष्टी मिळ- तील. तारुण्यांत ज्ञान मिळेल व मातारपणीं अंगांत जोम राहील. "अनुभव फार वेतन घेणारी शाळा होय; पण मूर्ख माणसें दुसऱ्या कोणत्याही रीतीनें शिकत नाहींत" असें फॅन्क्लीन झणे.
 आयुष्यक्रमाचा आरंभ चांगला झाला कीं, जीवनकलह अर्धा संपला. “ज्या मार्गानें जावयाचें तो मार्ग मुलांस शिकवा, ह्मणजे मोठेपणीं तो सोडणार नाहींत.” कार्याचा आरंभ नीट रीतीने करा ह्मणजे दिवसेंदिवस तें जास्त सोपें वाटत जाईल. उलट पक्षीं जर आरंभींच चुकी केली तर पुढें चुकी सुधारून घेणें सोपें नाहीं. शिकणें सोपें, पण भलतेंच शिकलेलें विसरणें सोपें नाहीं. पुस्तकांत, माणसांत, कल्पनांत, व संस्थेत चांगलें घेण्याजो- गतें काय तें मनांत नीट ठसवून घ्या. आपणापेक्षां इतरांस जास्त कळते ह्मणून लाज वाटावयास नको. आपणास जेवढे शिक- ण्याची संधि मिळाली तेवढें शिकलों नाहीं तर मात्र लाज वाटावी.
 अनेक भाषा शिकलों, किंवा अनेक गोष्टी माहीत झाल्या ह्मणजे शिक्षण मिळालें असें नव्हे. नुसत्या शिकण्यापेक्षां शिक्षण हा पदार्थ और, व विशेष महत्वाचा आहे. ज्ञान पुढील उपयो- गाकरितां बेगमी करून ठेवितें व शिक्षण हें बीं पेरितें; त्याला ३० पटीने, ६० पटीनें, कधीं कधीं १०० पटीनें फळें लागतात.