पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४


 कांहीं ठिकाणी शिक्षणापासून खरोखर फायदा होतो कीं काय ह्याविषयीं संशय उत्पन्न झालेला आढळतो. त्याचें कारण डॉक्टर ऑर्नल्ड असें सांगतो- “अज्ञान ह्मणजे पापाज्ञान असें चम- त्कारिक चुकीमुळें समजून लोक अज्ञानीपणाबद्दल आपलें समाधान करून घेतात. पण, खरी गोष्ट अशी आहे कीं मनुष्यांतून ज्ञान काढून घेतलें तर त्याच्या अंगीं बालपणींचें साधेपण येत नाहीं; उल- टपक्षी पशुपण येतें. इतकेंच नव्हे, तर तो पशुवर्गातला दुष्टांत दुष्ट घातक्यांत घातकी बनतो." कारण, (अन्यत्र तोच ग्रंथकार ह्मणतो) आयुष्यांत वाटाड्याप्रमाणें जें ज्ञान उपयोगी पडावें तें ज्ञान संपा- दण्यांत जर हयगय केली, तर मनुष्य आपल्या मनोविकारांचा दास बनतो; व उभय (बाल्यावस्था व तरुणावस्था) अवस्थां- तील व्यंगें त्याच्या ठायीं रहातात; ह्मणजे बालपणचें अज्ञान, व तरुणपणचे दुर्गुण.
 ज्याच्या शिक्षणाचा आरंभ शाळेत योग्य रीतीनें झालेला असतो, तो आपलें शिक्षण कधीं थांबू देणार नाहीं. क्षुल्लक तात्कालिक फायद्याकरितां शिकावयाचें, किंवा शिक्षण भातभाकर मिळण्यापुर्तेच मिळवावयाचें असें मानणें ह्मणजे शिक्षणाची किंमत फार कमी केल्याप्रमाणें होय. योग्य शिक्षणाचा हेतु सालोमन आपल्या गोड भाषेत असा सांगतो - शहाणपण ह्मणजे काय व शिक्षण ह्मणजे काय हें जाणणें, ज्ञानबोधक शब्द उमजणें, न्यायी, विचारशील, सारासारविचार पाहणारे, व शहाणे अशा माणसांकडून शिक्षण मिळविणें, लबाडी ओळखण्याची योग्यता साध्या माणसाच्या ठायीं आणणें, तरुणास ज्ञान व प्रसंगास उचित वर्तन शिकविणें हा शिक्षणाचा हेतु असला पाहिजे.
 थारो ह्मणतो “रुप्याचा एकादा डॉलर उचलण्याकरितां