पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पार पाडतात, स्वत:च्या मनाने नवीन गट सुरू करतात, गटांच्या संख्येमध्ये स्थानिक महिलांच्या पुढाकारामुळे व गटाच्या ताकदीमुळे सतत भर पडत राहते.
 गटाची ताकद महिलांना समजली आणि मग हळूहळू गट त्यांनी आपला मानला. गावा-गावातून स्वत:च्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या महिला, गटाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येऊ लागल्या. स्थानिक गटप्रमुखांनी बचत गटाची सर्व जबाबदारी घेतल्यामुळे उपक्रम फक्त प्रबोधिनीचा राहिला नाही. महिलांचा, गावांचा झाला आणि म्हणून तो रुजला, फोफावला, विस्तारला आणि वाढलाही.

अर्थिक साहाय्याच्या कारणाची वर्गवारी
जून १९९७ साली प्रबोधिनीच्या गटांना सुरु होऊन २ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने २ वर्षात अर्थसाहाय्याच्या कारणांची अधिक माहिती घेतली तेव्हा खालील गोष्टी लक्षात आल्या.
|- |क्र. |कारण |संख्या % |रक्कम % |- |१ |नित्य घरखर्च, कपडे |७१ |२४ |५७,४०० |२१ |- शेती, विहीर, जनावरे ६०,९०० धार्मिक विधी ४५,२०० कर्जफेड २३,८०० जागाखरेदी, परदुरुस्ती वस्तू खरेदी ३५,००० व्यवसाय ३०,५०० आरोग्य १७,७०० शिक्षण ५,८०० प्रवास ३,२०० । एकूण | २९२ १०० २,७९,५००/ १००. ६६                आम्ही बी घडलो ।