पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वतंत्रपणे चालून बघायला त्यांना जमेल का?
 अर्थात 'काळ' याचं उत्तर देईल.
 घराबाहेर न पडणाऱ्या महिलांची एवढी वाटचाल कशामुळे झाली? चार वर्षापूर्वी संस्थेला बचत गटांच्या कामासाठी मदतनीस हवी होती, तेव्हा कष्टानं एक मदतनीस मिळाली. आज कितीतरी संख्येत, चांगल्या शिकलेल्या मुली, महिला, स्वत:हून बचत गटांचं काम करण्यासाठी अर्ज करतायत. त्यामुळेच बचत गटाचं काम ५ वर्षात एवढं वाढलं आणि समाजाची त्याकडे पाहण्याची नजर बदलली आहे. यामुळे महिलांना हे काम जमेल असा विश्वास वाटतो.
गटांची स्वयंपूर्णता
 या सगळ्या ५ वर्षांकडे थांबून पाहिलं, तर दिसतं की गट संख्येनं जसे वाढले, तसे गुणांनीसुद्धा वाढले! अगदी ठळक गोष्ट वाटते ती म्हणजे गटांची स्वयंपूर्णता.
 गटातून संस्थेत जमा होणारा व्यवस्थापनाचा खर्च म्हणजे संघनिधी. गटांचे व्यवहार चोख असावेत, गटांचे व्यवहार तपासून घेता यावेत, म्हणून गटसंघनिधी जमा करतात. गटाला संस्थेतून मिळणारी सेवा फुकट वापरू नये, म्हणून गट ही रक्कम जमा करतात. त्यामुळे गटांना संस्थेचे हक्काचे व्यावहारिक मार्गदर्शन कायम मिळते. त्यातून संस्थेचा सर्व खर्च प्रत्यक्षात भागत नाही. परंतु गटांना मात्र असे व्यवस्थापकीय शुल्क देण्याची सवय लागते, ज्यामुळे गट अधिक स्वयंपूर्ण बनतात.
 आर्थिक स्वयंपूर्णता हा स्वयंपूर्णतेचा एक भाग. दुसरा म्हणजे उपक्रमांची स्वयंपूर्णता. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गट घेतला तरच गट. होणार ही परिस्थिती बदलूनही काही वर्ष झाली आहेत. जुन्या-जाणत्या गटांकडून शिकत, गटप्रमुखांच्या आणि संघटिकांच्या मदतीनं अनेक गट व्यवस्थित चालत आहेत. देण्या-घेण्याचे सर्व व्यवहार महिला चोखपणे
तुम्ही बी घडाना ॥              ६५