पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर सगळ्याच गटातील सभासदांच्या वाढीचा विचार करू लागल्या आहेत. या साऱ्यातून त्यांचं कर्तेपण वाढतयं हे मात्र खरं !
बदलली दिशा राजकारणाची
 वरवे गावात गेली कित्येक वर्ष एकाच पक्षाचं सरकार आहे. निवडणुका जवळ आल्या. तशी गावात जोरदार हालचाल सुरू झाली. 'महिलांच्या गटांचं ' नाव पार पुढाऱ्यांपर्यंत पोचलं होतं. त्यामुळे या खेपेला खुद्द पुढारी, उज्ज्वलाताईंची भेट घ्यायला गावात आले, अन् आमच्या पार्टीला निवडून दिलं तर गावाच्या आणि महिलांच्या विकासाची कामं करून देऊ, असा शब्दही दिला उजाताईनी विचार केला,यांनाही संधी द्यायला काय हरकत आहे? लगोलग त्यांनी सगळ्या गटांची बैठक बोलावली, आणि सगळ्या महिलांना सांगितलं "पहिल्याच बारीला पुढारी बायामान्सांकडं आलेत. आपली काम करून देणार म्हणून शब्द बी दिलाय, तर या वर्षी त्यांना संधी द्यायला हवी." महिलांना हा विचार पटला, त्यांनी विचारलं, "उजाताई काय करायचं ते सांगा." उजाताई म्हणाल्या "घरचे आपल्याला सांगतील त्यांना 'हो ' म्हणायचं, पण मतदान केंद्रात आतमधे जाऊन हवा तिथंच शिक्का मारायचा. त्यासाठी सकाळी ७ ।। ला सगळ्यांनी शिक्का मारायला रांग लावायची."
 दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या आधी सगळ्या महिलांचं मतदान झालं. बायकांचं ऐकून पुरुष म्हणाले "आपल्या घरच्या बायकांनी वेगळं मत दिलंय, तर आता आपण बी तेच करू," इतक्या वर्षात जे कधी झालं नव्हतं ते घडलं गावची जुनी पार्टी जाऊन, गावात नवीन राज्य आलं, बचतगटाच्या बायांनी राजकारणाची दिशा ठरवली. आता म्हणायचं का "बायकांची अक्कल चुली पुढंच म्हणून ?"
६२                आम्ही बी घडलो।