पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जास्त झाली तर गावावर परिणाम करणारं काम त्यातून घडू शकतं असं लक्षात आलं. त्यामुळे जास्त गट असणाऱ्या प्रत्येक गावात प्रबोधिनीने अशी महिला गट प्रमुखांची समिती स्थापन केली. तिला नाव दिलं
जिजामाता प्रबोधन समिती.
 कुसगाव मध्ये अशी समिती १९९७ साली प्रथम स्थापन केली. आता अशी समिती १४पेक्षा जास्त गावात आहे. ही समिती महिन्यातून एकदा जमते.
 कुसगावमध्ये एका पाठोपाठ एक असे ११ गट सुरू झाले. इतर गटात काय चालतं ते प्रत्येक गटात माहिती व्हावं म्हणून गटांमधून महिलांची निवड केली. अशा १५ जणींची बैठक दर महिन्यातून एकदा मंदिरामध्ये घ्यायला प्रबोधिनीने सुरूवात केली. गटांमधून कुणा कुणाला, कुठल्या कारणासाठी, किती अर्थसाहाय्य दिलं, कुणाच्या परत फेडीमध्ये काही अडचणी येतात का?, अशा विषयावर या बैठकीत चर्चा होते. त्यातून एखाद्या गटाची उरलेली बचत दुसऱ्या गटाला कर्ज म्हणूनही दिली जाते. या व्यवहाराची सवय झाल्यावर मग मात्र ही बैठक नुसती व्यवहारापुरती मर्यादित राहिली नाही. गावाच्या महिला विकास उपक्रमांची चर्चाही या बैठकीत करू लागल्या.
 वेगवेगळ्या गावात या अशा बैठकीमुळे खूप काय काय घडू शकलं. अशाच बैठकीमधून खोपी गावच्या महिलांनी सहल ठरवली, तर कांजळ्याच्या महिलांनी गावमेळावा ठरवला - त्या मेळाव्यांची सारी योजना महिलांनीच बैठकीत केली आणि मेळावा पार पडला. अवसरवाडीत आरोग्य तपासणी ठरवली तर सणसवाडीत पशु उपचार शिबिर ठरवलं. आता महिला गावच्या विकासाच्या चर्चाही त्यात करू लागल्या आहेत आणि किती गावात काय काय ठरलं.
या सगळ्यातून गट प्रमुख असणाऱ्या महिलांची, गटव्यवहाराची समज चांगली वाढली आहे. त्या एकत्र येऊन आपल्या गटापुरताच नाही
तुम्ही बी घडाना ॥                ६१