पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकं राहातात. तिथं धनगराचं ठाणं, तिथं माझ्या गटातली हरू राहते. तिथवर गाव पसरलाय बघ आपला."
 आजपोतर तिच्याच आळीपर्यंत मर्यादित असणारं गाव आता। वाढलं होतं. आणि गावातल्या माणसांच्या मनात जागा मिळाल्यानं । धनगराला पण गावात कुणी आपलं राहातं असं वाटायला लागलं आहे,
बैठक जागजागी बसली, संधी सर्वांना मिळाली
 जुन्या जाणत्या परंपरेचं खोपीगाव. गाव खूप मोठं पण दोन वस्त्यात विभागलेलं. गावात सारं व्हायचं पण एकाच ठिकाणी! त्यामुळे तिथल्या जवळच्या घरातलं माणूसच फक्त हजर राहायचं. गावात गट सुरू करायचे ठरलं त्यावर चर्चा झाली; कुठं जमायचं? ठरलं मंदिरात! नेहमीप्रमाणे दहा बायां जमल्या व्यवहार सुरू झाला. त्याचे फायदे ओळखून अजून गट सुरू व्हायला लागले. पण सर्वांना एकत्र जमणं अवघड वाटू लागलं. मग बैठक बसली.यशोदाबाई म्हणाली, "माझ्या वाड्यावर बैठक बसवा. ४० बायांना जमवते बघा! हितं यायचं तर आम्ही चारच येऊ". यावर खूपच चर्चा झाली. आजवर गावात सारं एकोप्यानं झालं! ही तर फुटीची। भाषा बोलते असं काहींना वाटलं, सावित्रीनं साऱ्यांना समजून दिलं "बरं बरं तिथं बसा. पन बायांना आधी एकत्र यायला, व्यवहार करायला तर शिकवून मग साऱ्या गावाला एकत्र करायला शिकू या. सावित्रीचं पटून सान्यांनी होकार दिला. प्रत्येक वाड्यावर आता एक गट भरतो. गावात ७ गट भरतात. जिथं तिथं बसल्यामुळे एकाच वेळी सारे गट गडबड गोंधळ न होता पार पडतात. एरवी गाव मेळाव्याला २५ जणी जमवायलाही खूप कष्ट घ्यावे लागायचे आता ७० जणी मेळाव्याला सहज जमतात. गावातल्या घराघरात पोहोचायचं झालं तर असं काय काय करावं लागतं.
 त्यामुळे काम शेवटपर्यंत पोहोचवता येतं आणि साऱ्यांना सामावून घेता येतं.

४४                 आम्ही बी घडलो ।