पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गटांना वळण लागते तेव्हा
गट कोणाचा
 "३०० रु. ची चूक होतिया. कुनी तरी रक्कम कमी दिली", गट सुरू होऊन सात-आठ महिने झाले होते आणि अशाच एका बैठकीत गट प्रमुखांनी हे जाहीर केलं. आपसात चाललेला कालवा थांबून गटामध्ये एकदम शांतता पसरली.
 "नीट मोजलं का? चार येळेला मोजून आजूबाजूला पाहून झालं, पण तपास लागला नाही.
 "आता या रकमेचं करायचं काय? "
 "कुनी गोळा केलं?" - एक प्रश्न आला.
 'मी गटप्रमुखांपैकी एकीनं सांगितलं.
 "मग तूच भर – एकजण म्हणून मोकळी झाली.
 'मी ? का म्हणून?सगळं खापर माझ्याच डोक्यावर होय?
 ध्यान दिलं असतं, तर ही वेळ आलीच नसती," - एक
गटप्रमुख.
 " पण आता करायचं काय? कुनी भरायचे पैसे."
 संस्था गट चालवते, तेव्हा संस्थेनंच घ्यायची जबाबदारी."
 संस्थेच्या ताईंनी प्रश्न केला- गटात फायदा झाला तर आपण संस्थेला त्यात सहभागी घेणार का? गटाचा फायदा तो संस्थेचा फायदा असं आपण म्हणणार का?" सगळ्याजणी विचारात पडल्या.मग एकीला आठवलं.
 ' गावकीच्या फंडात असा घोळ झाला, तर आपुनच सावरून घेतो. दुसरं कोन येतंया भराया?
तुम्ही बी घडाना ॥                 ४५