पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढदिवसाचं आमंत्रण करायला त्या गेल्या होत्या. एरवी सखुबाई हे बोलल्यासुद्धा नसत्या. पण गटात येऊन त्यांना त्यांचं दु:ख बोलून दाखविण्याचं बळ मिळालं होतं. सविताताईंनाही हे ऐकताना वाईट वाटलं. अस व्हायला नको होतं असं त्यांनाही वाटलं.
गाव मोठं झालं
 कुसगावात महिला गटात येऊन स्वत:पलिकडे असंच पहायला शिकल्या. गावात राहाणाऱ्या महिलांना डोंगरावरची धनगर वस्ती पण आपलीच आहे असं वाटायला लागलं. कुसगाव तसं डोंगरकुशीतलं गाव! डोंगरावर धनगराची चार घरं! तसं म्हटलं तर गावातली, पण पार तुटक! गावात गटाची संख्या वाढली आणि डोंगरावरच्या धनगर भगिनीही गटाच्या सभासद झाल्या. महिन्यातनं एकदा त्यांची गावातल्या बायांमध्ये ऊठबस सुरू झाली. एरवी ही आपल्याच का गावातली? असं इतरांना वाटायचं. पाऊस काळात त्यांना डोंगरावरून पार गावात यायचं तर अवघड म्हणून त्यांचे पैसे कुणी कुणी भरू लागली.
 एकदा धनगरांची हरूबाई गटात आली. तिच्या शेजारी सरू बसली. ती बोलू लागली "काय गं तू पण वाण्याचं सामान इथनंच भरतेस का?" हरूनं फक्त होकार देणारी मान हलवली. सरूला कसंसंच झालं. जिणं किती कष्टाचं असं वाटलं.
 थोड्या दिवसातच उन्हाळा असून हरू गटाला आली नाही. सरूला चुकल्या चुकल्यासारखं झालं. तिनं हरूचे पैसे भरले. गटात म्हणाली, "दिवसभर गावच्या हपशीवरनं डोंगरावर पाणी वाहून दमली असंल, डोंगरावर पाणी न्यायचं थोडं का आहे? बिचारी !" त्याच महिन्यात सरूच्या पोराचं लगीन ठरलं. नवी सून घरात आली. तिला गाव दाखवत सासवा सुना गावभर फिरल्या तोवर सांजवेळ आली. शेवटी पारापाशी येऊन सरून लांब डोंगराकडं बोट दाखवूनसुनला सांगितलं, “त्या तिथवर,
तुम्ही बी घडाना ॥                 ४३