पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागला, तसं वाटलं, यांच्यापर्यंत गट कधी पोचायचा? यांना तर गटाची गरज माझ्यापेक्षा जास्त आहे. या महिलांना जर त्यांची समज नसेल तर मला ते सांगितलं पाहिजे. म्हणून संस्थेच्या ताईंच्या साथीनं । धनगरवाड्यावर गेले. इतके दिवस गावात राहुनपण धनगरवाड्याची वस्ती, कुठं ते मला माहितच नव्हतं. बामणीण आपल्या घरात गटाबद्दला सांगायला येतीय म्हटल्यावर धनगर महिलांनी विश्वासानं आणि उत्साहानं गट सुरू केला: धनगर महिलांना शिक्षण कुठून असणार? मग । माझ्या शिक्षणाचा उपयोग त्यांच्या हिशोबासाठी पण करायला लागले.
 स्वत:ला काही गरज नसताना स्वत:च्या घरापलीकडे पहायचं, जे पूर्वी कुणी केलं नव्हतं, असं काम करणं, म्हणजे मोठीच मोलाची, तेवढीच हिमतीची गोष्ट! स्वतःमधली हिंमत सुखदाताईंना यातूनच कळली. गटातून स्वतःची ओळख पटत गेली ती अशी. आपली ओळख पटवून घेताना सुखदाताईंची कहाणी आपल्याला नक्कीच सोबत करेल.
गटानं दिली 'एक' व्हायला संधी
 गट चालू झाले तशा महिला एकमेकींत जात-पात, गरीब श्रीमंत । असा फरक न करता मिसळायला शिकल्या. चुकीच्या पद्धती सोडण्याची । हिंमत एकदम येत नाही, ती हळूहळूच येते.
जातपात विसरूया एकोप्यानं राहू या
 "एरवी रामाच्या मंदिरातसुद्धा मांडीला मांडी लावून बसतो, रामसुद्धा कोणाला काही म्हणत नाही, अन् घरी आले तर तुमच्या जावेनं पाणीसुद्धा विचारलं नाही? खालच्या जातीचे असलो म्हणून काय झालं?"
 शिवापूरच्या सखुबाई दुखावून सविताताईंना सांगत होत्या. सविताताई त्यांना जामीन होत्या म्हणून मोठ्या आपुलकीनं मुलाच्या
४२                  आम्ही बी घडलो