पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गट पसरले गावोगाव
केल्यामुळे... विश्वास वाढला
 शिवापुरातला पहिल्या नंबरचा गट म्हणजे आमचा गट. आता त्याला ५ वर्ष पूर्ण होतील. ठरल्याप्रमाणे आमचा गट ५ वर्ष चाललाय. शिवापूरच्या कांचनताई पुरंदरे गटाबद्दल फार अभिमानाने सांगत होत्या.  पाच वर्षांनंतर गटाचा हिशोब करून पैशाचे चोख वाटप केले. इतरांची मदत घेऊन नीट उरकलं. साऱ्यांना समाधान वाटलं आणि पुन्हा त्यांनी नव्या विश्वासानं गट सुरू केला.
 "शाळा सोडून किती वर्षं झाली. गटामुळे पुन्हा शिक्षण सुरू झालं. घरचं संभाळून पुन्हा गटाचं करायचं, म्हणजे बरीच धावपळ व्हायची, पण गटाची साथ आहे म्हणून उत्साह वाटतो. इच्छा असली आणि शिकायची तयारी असली म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करता येतात."
  गटामुळं चांगलं काहीतरी करण्याचं समाधान मिळतं! चार गरजू महिलांनाही मदत करता येते. आमच्या गावाजवळच्या वस्तीमध्ये मी शेतमजूर महिलांचा गट केला. वाल काढायला, टोमॅटो खुडायला आमच्या शेतावर मजुरीनं महिला येतात, तेव्हाच त्यांना मी गटाबद्दल सांगितलं. आणि त्यांचा गट सुरू झाला. मला जे येते, ते इतर महिलांना शिकवायची त्या निमित्ताने संधी मिळते.
 कांचनताईंचं तर स्वत:चं सगळं चांगलं चाललं होतं, मग त्यांना दुसऱ्या कुणाचा विचार करण्याची काय गरज होती? कुणासाठी तरी का करावंसं वाटलं? तर दुसऱ्या कुणाचं तरी भलं व्हावं यासाठी करावसं वाटलं. त्यांचं एकत्र कुटुंब ! त्यामुळं पहिल्यापासून जबाबदारीनं खूप काम करण्याची त्यांना सवयच होती, तरीसुद्धा गटात आल्यामुळं विश्वास

तुम्ही बी घडाना ॥                 ३९