पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
पैसे असे खेळतात.....

 सखुबाईकडं एक १० रुपयाची १नोट होती.
 तिच्या घरी पाहुणे आले म्हणून तिला सरबत
करायंच होतं. ती गेली पारुकडे तिच्याकडनं तिनं
१० रुपयाची नोट देऊन ४ लिबं खरेदी केली.
 पारुचं दळण भिमाच्या गिरणीत दळायला दिलं
होतं, पारुनं सखुनी दिलेली १० रुपयाची नोट
भिमाला दिली आणि दळण घेऊन आली.
 भिमाचं झंपर राधाकडं शिवायला दिलं होतं.
दळणाचे पारुनं दिलेले १० रुपये तिनं राधाला दिले
आणि झंपर घेतलं
 राधाने ते १० रुपये चहासाठी साखर
आणायला वापरले तेव्हा ते सुजाताकडे गेले.
 म्हणजे बघा, १० रुपयाची एकच नोट होती.
पण त्यातनं सखु-लिंब, पारु-दळण, भिमा-झंपर,
राधा-साखर अशा ४ जणींची खरेदी झाली. आणि
पुन्हा सुजाताकडं १० रुपये जमा झाले. म्हणजे
१० रुपयाच्या नोटेतून फिरत राहील्या मुळे
४ जणींची मिळून रुपये ४० ची गरज.
भागली. याला म्हणायचे पैसे खेळण.
आपापसात व्यवहार करण्याचा हाच फायदा. बचत
गटाच्या व्यहारामुळंही असंच होतं!
      ___ अधिक तपशील - परिशिष्ट १, पान ७२ ।

३८             आम्ही बी घडलो।