पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढला. आता त्या या सगळ्याबरोबरच छोटे छोटे उद्योग करू लागल्या आहेत. त्या भाजणी बनवून विकतात, लिक्विड सोप, लेदर बॅगही विकतात. स्वत: मधला विश्वास वाढला की जमतं सारं,
मलाच माझी ओळख पटली
 ब्राह्मणाच्या सुनेनं धनगरवाड्यावर जायचं? आजवर न ऐकलेली, घडलेली गोष्ट. सुखदाताईंनी ही चाकोरी ओलांडली आणि ती ओलांडतानाच त्यांना स्वतःची ओळखही पटत गेली.
 “मला कधी वाटलंच नव्हतं बघा, की घराबाहेरच्या जबाबदाऱ्या मला कधी घेता येतील म्हणून. मला कुणी सांगितलं असतं, की तू बँकेचे व्यवहारसुद्धा बघशील तर माझा विश्वासच बसला नसता. कधी घराबाहेर पडायची वेळच आली नव्हती. गावाबाहेरच्या धनगरवाड्यात तर मी पाऊल ठेवीन असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं."
 आंबवणे गावात गट सुरू झाले तेव्हापासून गटाबरोबर असणाऱ्या सुखदाताई देशपांडे सांगत होत्या. गावातल्या ब्राह्मणाची सून गावाला। माहिती असणार ती ब्राह्मणाच्या घरातली सून नाहीतर अमक्याची बायको म्हणूनच.याच्यापलिकडे महिलेची काही वेगळी ओळख असल्याचं आपण काही पहात नाही. पण सुखदाताईंची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. गावात आता केवळ त्या संजूकाकांची बायको म्हणूनच नाही तर देशपांडेवहिनींची सून म्हणूनच नाही तर बचत गटाच्या सुखदाताई, बँकेच्या योजनेत असणाऱ्या सुखदाताई, उद्योग करणाऱ्या सुखदाताई, म्हणून जास्त ओळखल्या जातात.
 सुखदाताई सांगतात "आमचा वैभवलक्ष्मी गट सुरू झाला तेव्हाची गोष्ट. ताई गावात घरोघरी फिरून गटाची माहिती सांगत होत्या. पण दर । महिन्याला २०रुपये भरायची जोखीम कोण घेणार? त्यामुळं कोणीच महिला गटात येईनात. गटाची माहिती ऐकल्यावर मला वाटलं की यात

४०                 आम्ही बी घडलो।