पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मस्तपैकी अडकावायच्या-रेक्झीनच्या पिशव्या तयार करायच्या. सगळी जबाबदारी गटाची -खरेदी- ऑर्डर नुसार संस्थेत माल पोचता करणं, हिशोब करणं, सगळंच! भारतीताईंकडे खातं आलं हिशोबाचं आणि खरेदीचं. दर वेळी गटातली एक जण भारतीताईं बरोबर खरेदीला येते. दोन-अडीच तासात एक बॅग शिवायची. एका बॅगला २५ रुपये करणावळ. सातही जणींनी २०० रुपये या उद्योगासाठी गुंतवले आणि स्वतःच्या पैशातून उद्योग सुरू केला. आता सर्व गटांना लागणाऱ्या पिशव्या भारतीच बनवते.
 गटात आल्यामुळे भारतीताईंच्या अंगच्या उद्योगाच्या गुणांना फुलायला, वाढायला संधी मिळाली ही खूपच महत्त्वाची गोष्ट. पण त्याही पेक्षा अधिक काहीतरी भारतीताईंना गटातून मिळालं. सुरूवातीला कोणत्याही मोठ्या लोकांशी, अगदी संस्थेच्या ताईंशीसुद्धा एकटीन बोलायला दडपण येणाऱ्या, कुणाची तरी सोबत लागणाऱ्या भरतीताई “बचत गटाचं प्रशिक्षण द्यायला किती मजा येते," असं म्हणतात आणि सर्वांच्या लक्षात रहातात ! संघटिकांच्या जोडीनं बचत गटाचा कारभार साभाळतात. शिवापूरच्या बचत गट ऑफिसात पूर्वी कधीतरी जाणाऱ्या भारतीताई आज तिथली जबाबदारी नियमितपणे सांभाळतात. गटामुळे भारतीताईंना स्वतःच्या वाढण्याची दिशा गवसली ही खरी मोलाची गोष्ट!

***




-----

३२              आम्ही बी घडलो ।