पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
आम्ही गटाला वाढवलं,
गटानं आम्हाला वाढवलं,

 दुष्काळामुळे शेतीवाडी परवडेनाशी झाली म्हणून बीडमधून थोरात कुटुंब शिवापूरमध्ये आले. शिवापूर गावात कारखाने, उद्योग खूप गावात बिगारीची कामंही निघतच असतात, त्यामुळेच हातावरचंच पोट असणाऱ्या सगळ्यांनाच शिवापूरात आसरा मिळत असतो- तसा तो थोरात कुटुंबीयांनाही मिळाला.
 घराताला पुरूष कर्ता कमविता असला तरी घरातल्याच बाईलाच घरची लक्ष्मी का म्हणतात, हे थोरातांच्या उदाहरणावरून सहज समजावं.
 कितीवेळा तरी घरी आलेल्या अडचणींमुळे घरातली सून पांढऱ्या पायाची ठरते. मोहोरताई थोराताचंही तसंच झालेलं होतं. घरची परिस्थिती खालावली ती हिच्याच पायगुणानं असं घरचे म्हणायचे. माझा दोष नसताना मला बोल लागायचे म्हणून मोहोराताई कष्टी व्हायच्या. आधीच सासूरवाशीण. त्यात अवगुणी म्हटल्यावर मोहोरताईंच्या कुठल्याही शब्दाला काडीइतकी किंमत नव्हती.
 ताई शिवापुरात आल्या ते मरगळल्या मनानं. घरातली परिस्थिती अशी! त्यामुळे स्वत:बद्दल विश्वास तरी कसा वाटावा? मोहोरताईंना लाख वाटायचं, आपण गावी काहीतरी हातभार लागावा, जरा तरी आपल्याला सासरच्यांनी भलं म्हणावं. पण परक्या गावात राहून पोट भरायचं म्हणजेच तारेवरची कसरत! मदत होणार तरी कुठून?
 तरी मोहोरताईंनी हिंमत सोडली नव्हती. स्वत: दहावीपर्यंत शिकलेल्या होत्या. एक दिवस त्यांच्याबरोबर मजुरी करायला येणाऱ्या

-----

तुम्ही बी घडाना ॥                 ३३