पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाऊन सगळं गोळा करायचं,आणि घरचं उरकलं की, गवत काड्या वेगवेगळी करणं, नेमक्या मापात कापणं, जुड्या बांधणं असा घरच्या घरी उद्योग सुरू झाला. संस्थेनं यांच्या पहिल्या मालाला बाजार मिळवून दिला. वस्तीवरच्याच दोघींना हाताशी धरून पहिली ऑर्डर पोचती केली ती ५०० जुड्यांची! त्यातून शिकल्या आणि नेमानं दुकानाला पुरवू लागल्या. "डोईजड होणाऱ्या मोळीपेक्षा हे बरं, यात झाड पण वाचतं. असं सांगून चार जणींची पोटापाण्याची सोय त्यांनी केली.
 गटामुळे बाहेर फिरणं होतं, नवं काही बघणं होतं, नवीन सुचतं, नवी दिशा मिळते याचंच हे चांगलं उदाहरण नाही का? जिथे बारमाही रोजगार कधीच मिळत नाही तिथे असा रोजगार निर्माण करणं, ही लाख मोलाचीच गोष्ट म्हणायला पाहिजे नाही का? हिंमत केली की - गटाच्या साथीनं लक्ष्मी आपल्या घरी चालत येते.

बाई मी उद्योग करते

 जातिवंत उद्योजिका कशी असावी ते शिकावं भारतीताईंकडून!
 गटानं भारतीताईंच्या गुणांना खतपाणी घातलं. त्यामुळे तर - उत्साहानं आणि विश्वासानं नवनव्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या भारतीताई सुवासिनी बचत गट कारभाराचा आधार बनल्या आहेत."
 अमरावतीची भारती, लग्नानंतर शिवापुरात खासबागे होऊन आली. एम्. ए. पर्यंत शिक्षण झालेलं. नवीन गावात फारशा ओळखी नाहीत. प्रश्न पडायचा, 'करायचं तरी काय?' मग तिला कळली गटाची माहिती. चारचौघीत येणं-जाणं होईल. म्हणून गटात यायला तिने सुरूवात केली. दोन वर्ष भारती नियमितपणे गटात येत गेली. पण हळूहळू भारतीला दिसलं,की आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या, अगदी निरक्षर बायकासुद्धा घराबाहेर पडतात, स्वतःच्या हिंमतीवर उद्योग करून, संसाराला हातभार

-----
३०              आम्ही बी घडलो।


..