पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गटात आले म्हणून बाई सारं बदललं...
माझ्या नावावरचं पैसं
 'ताई माझं पुस्तक बघून मला हिशोब सांगा किती जमलं ते.' ताईंनी हिशोब केला आणि सांगितलं '७ महिने २५ रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे जमलेत १७५ रुपये' तान्हुबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आज इतकी वर्ष संसार केला, पण माझ्या हातात भाजीच्या २० रुपयापेक्षा जास्त पैसं कधीच आले नाय. गुपचुप साचवलेल्या पैशाला कधी पाय फुटायचे कळायचं बी नाय. बघता बघता एवढं साठलं, हेच खरं आधाराचं म्हणायचं.
 पुस्तकातल्या या १७५ रुपयापेक्षा तान्हुबाईंसाठी गटामुळं मिळालेला हक्काचा आधारच जास्त मोलाचा.
 गटात येण्यानं महिलांना हळूहळू स्वत:ची जाणीव व्हायला लागली. जगण्याचा, काहीतरी करण्याचा हुरूप वाढला.
आता मला नीटनेटकं राहावसं वाटतं
 वेल्हे तालुक्यामधल्या सर्व बचत गटाच्या प्रमुखांची बैठक दर महिन्याला होते. साऱ्याजणी आपापल्या गटात काय झालं ते सांगायला येतात. एका गटप्रमुखांच्या बैठकीला हिराबाई चांगल्या तास-दीडतास उशीरा आल्या. एकीनं विचारलं, “काय हिराबाई, बैठक तर संपली, एवढा उशीर कशापायी?आवरून झालं नाही का?" यावर हिराबाईंची सोबतीण म्हणाली" आवरून झालं होतं तर काय. पन हिचं नखरंच. निस्तं बाजारला यायची असती तर एवढ्या वेळात चार बाजार करून आली असती." हिराबाई यावर गालातल्या गालात हसून म्हणाल्या “खरंच ताई, मी

तुम्ही बी घडाना ॥        १९