पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गटात तिला मिळालेल्या विश्वासाची!
 गटाच्या व्यवहाराला जामीनदार अशीच हवी की जी घेतलेले अर्थसाहाय्य योग्य प्रकारे कारणी लावते ना? हे काळजीनं बघते, त्या। रकमेची जबाबदारी स्वीकारते.
 गट सुरू झाला की सुरूवातीला असं कुणाला कुणी जामीन राहायला तयार नसतं, ती मोठी जोखीम वाटते. अर्थसाहाय्य घेणारी । सभासद बळे बळे कुणाला तरी जामीन राहायला लावते. पण गटात व्यवस्थितफेड होऊ लागल्यावर मात्र एकमेकींच्या व्यवहारावरचा विश्वास वाढतो.
 गट चालतात ते. महिलांना एकमेकींबद्दल असलेल्या या विश्वासावर, हा विश्वास हेच गटाचं खरं धन. हाच या गोष्टीचा सांगावां.

वेळेवर परत फेड झाली तर.....
 बचत गट सुरु झाला की ३ महिने फक्त बचत जमा करावी. प्रमुखांची नावे नक्की झाली की गटाच्या नावाने बँकेत खाते उघडावे. त्यात बचतीची रक्कम जमा करावी. ३ महिन्यांनंतर अर्थसाहाय्याचे व्यवहार सुरु करावेत. सुरुवातीस महिलांना उलाढालीचा पुरेसा शिश्वास नसतो. त्यामुळे अर्थसाहाय्याची मर्यादित घातल्यास चांगले. उदा.प्रत्येकी रुपये ५०० पर्यंत. असे केल्यास अनेकींना लवकर अर्थसहाय्य मिळते. गटातल्या ५०% पेक्षा जास्तजणींना आर्थसाहाय्य मिळाले व ते व्यवस्थित परतफेड होऊ लागले की गटाचा विश्वास वाढतो यासाठी वेळेवर आणि ठरल्या प्रमाणे केलेली परतफेड होणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्य्या गट लवकर स्वयंपूर्ण होतो.
अधिक तपशील - परिशिष्ट १, पान ७२

१८          आम्ही बी घडलो ।