पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 गटाचं तंत्र
* गट कशासाठी करायचा?
 • स्वत:ला आणि अशाच काहीजणींना हक्काचा पैशाचा आधार   मिळावा, एकमेकींच्या आधारानं पुढं जायला मिळावं म्हणून.  • गटाच्या आधारानं स्वत:ला, स्वत:च्या घराला,   {{gap} गावाला सुधारायची संधी मिळावी म्हणून.  • ताठ मानेनं जगण्याची, नव्या नव्या गोष्टी शिकण्याची   उभारी मिळावी म्हणून

यासाठी गट करायचा.

* किती जणींचा हा गट करायचा?
  एकमताच्या कमीत कमी ५ किंवा जास्तीत जास्त २० जणी जमल्या की गट झाला. जर सभासद २० पेक्षा जास्त जमले, तर कायद्याप्रमाणे गटाची नोंदणी करावी लागते.
 २० किंवा २० पेक्षा कमी असला की महिलांचा गट, नोंदणी न करताही सर्व व्यवहार करू शकतो. गटाच्या नावाने बँकेत खाते सुद्धा काढू शकतो.
* कोणी, कसा गट चालवायचा असतो?
 'गटाची जबाबदारी सगळ्यांचीच. सर्व प्रथम गटाला जमलं की सर्वांनी मिळून गटाचं नाव ठरवायचं, वेळ, तारीख ठरवायची: गटात जमणारी रक्कम घेणं, मोजणं, नोंदवणं ही सगळी व्यवहाराची कामं करायला गटप्रमुख म्हणून गटातल्या तीन जणी निवडायच्या. त्यांना मात्र लिहिता वाचता यायला पाहिजे. म्हणजे व्यवहार नीट होतात. पण मुख्य म्हणजे

तुम्ही बी घडाना ॥