पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरवे गावच्या बचत गटाची ताकद निर्माण करणाऱ्या उज्ज्वलाताई, रहाटवडे गावातल्या कितीतरी महिलांच्या अडीनडीला धावणाऱ्या शांताबाई, ही याची उत्तम उदाहरणे.
 या सगळ्या घडामोडींचे पडसाद गाव पातळीवर उमटले नसते तरच नवल. गावात महिलांची एकत्र ताकद उभी राहू शकली. आता तर अपवादात्मक ठिकाणी गाव गटांकडे आधारासाठी यायला लागलं आहे. आता जवळपासच्या तीनचार गावातल्या महिला मिळून भागावर काही परिणाम घडवण्याचा प्रयत्न करू लागल्या आहेत.
 गावातली जात-पात, गरीब-श्रीमंत ही बंधनं हळूहळू सैल होऊन गावातलं वातावरण बदललं. काही गावांमध्ये तर गावच्या महिलांनी गावच्या राजकारणाची दिशा ठरवली. गावपातळीची हळूहळू समीकरणं बदलायला लागली आहेत. यामुळेच महिलांच्या राखीव जागांसाठी चांगले पर्याय उभे राहात आहेत.
 आपल्या मैत्रिणी कशा घडल्या हे वाचताना, त्यांची धडपड समजून घेताना, आपल्यालाही अशी धडपड करण्याचं बळ यावं, म्हणून केलेला प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक! आणि अशा कितीतरी महिला आणि गट , ज्यांची नावे यांत नाहीत असे गावा-गावातून शिकतायत आणि शिकवतायत. ही तर त्यापैकी काही केवळ हिंमतवान महिलांची, बहाद्दर गटांची तोंडओळखच ! करूया तर मग फेरफटका या गटांचा......... कीमा प्रकाशा निका मिजा कालो तिहार कोजक जीपालाउडा गि - जियोनीका शिर मला मानशाणा Hars RTOOली काया नाशिकजनिक आइजना ली शाळांका आम्ही बी घडलो।