पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गट सगळ्यांनी मिळून एकमताने चालवायचा.

  • गटात किती रक्कम भरायची?

 हे गटानंच ठरवायचं.
 प्रत्येकीला परवडेल अशी, आपल्या ऐपतीनुसार बचतीची रक्कम ठरवून, दरमहा जमा करायची. एखाद्या गटाची बचत दरमहा २० रुपये . असेल तर, एखाद्या गटाची दरमहा २५ रुपये. शिवापूर भागातल्या काही गटांची तर रुपये ५० किंवा रुपये १०० अशीसुद्धा बचत आहे. पण गटातील सगळ्यांची बचत सारखी पाहिजे. म्हणजे अधिकारही सारखाच राहतो.

  • गटात जमलेल्या रक्कमेचे काय करायचे ?

 गटात जमलेली रक्कम, गटाला वळण लागलं म्हणजे गटातल्याच सभासदांपैकी जिला हवी असेल तिनं उचलायची. म्हणजे अर्थसाहाय्य (कर्ज) घ्यायचं. कशासाठी हवं, किती हवं ते अर्जावर लिहून द्यायचं. गटाच्या नावानं तारण म्हणून घरातील स्वत:च्या मालकीची वस्तू लिहून द्यायची. परतफेडीसाठी गटातल्या दोघींना जामीन रहायला सांगायचं. कोणाला किती अर्थसाहाय्य द्यायचं हे गटातल्या सगळ्यांनी मिळून ठरवायचं. जिची गरज जास्त तिला आधी रक्कम द्यायची. त्यासाठी आपापसातली भांडणं विसरायची तयारी हवी. गटात सगळ्या जातीच्या, सगळ्या परिस्थितीतल्या महिला सारख्याच. कुणी मोठी नाही की कुणी लहान नाही.

  • घेतलेल्या अर्थसाहाय्यांची (कर्जाची) परत फेड कशी करायची?

 अडीनडीला सभासदांना आधार मिळावा म्हणून गट चालतो. अर्थसाहाय्याची परतफेड कशी करायची तेसुद्धा गटानं एकमतानं ठरवायचं.परतफेडीचा किती हप्ता ठरवायचा त्या विषयी आधी नियम करायचा. उदाहरणार्थ ५०० रुपये अर्थसाहाय्य घेतले तर दरमहा १००

-----

           आम्ही बी घडलो ।