पान:आमची संस्कृती.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


८० / आमची संस्कृती
केवळ आपल्या अनुभवजन्य ज्ञानाचा लाभ दुसच्या लोकांना देण्याची त्यांची इच्छा असते. अशा लिखाणात ममत्वाचा ओलावा व अंत:करणाला चटका लावणारे वर्णन, ही आढळत नाहीत; पण त्याच्या उलट, केतकर ही व्यक्ती, तिने केलेले सामाजिक प्रयोग, त्यांतील यशापयश व त्याची कारणमीमांसा ह्यांचे शास्त्रीय विवेचन आढळते. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग हा एक सोदाहरण सोडविलेला सामाजिक प्रयोग बनतो. १९२० मध्ये श्री.शीलवतीबाई केतकर यांनी ब्राह्मण व इतर मध्यम वर्गातील विधवा स्त्रियांना काही उद्योग काढून द्यावा ह्या हेतूने ‘स्त्रीकर्मसदन’ नावाची एक संस्था काढली व सुमारे सहा महिने काम चालून ती संस्था १२०० रुपयाच नुकसान होऊन बंद पडली. केतकरांनी ह्या घटनेबद्दल पुढीलप्रमाणे लिहिलेले आहे- ‘१२०० रुपये गेले याबद्दल मला आज मुळीच दुःख होत नाही. त्या कामामुळे जो अनुभब मिळाला त्यामुळे.. गेलेले रुपये वसूल होतील, असा मला विश्वास वाटत आहेजरी १२०० रुपये नुकसान आले तरी स्त्री कामकज्यांच्या वाट्यास रुपये देखील आले नाहीत माल तीनचार ६०० आले हजारांचा झाला; पण भाडेकापड व जाहिरात यांनीच बरीचशी रक्कम खाल्ली. या कामात एक गोष्ट कळली ती ही की, एखाद्या विशिष्ट वर्गाला काम देण्यासाठी कारखाना काढावयाचा असेल तर जे काम काढायचे त्यात मालाची किंमत ज्यांत फार कमी आहे व मजुरीची किंमत ज्यात जास्त आह अशा तर्हेचा तो उद्योग असावा. या दृष्टीने छापखान्याचे काम श्रेष्ठ ठरते." कुटुंबसौख्याविषयी केतकरांनी प्रकट केलेले विचार त्यांच्या आयुष्यातील अनुभवजन्य ज्ञानाचेच आहेत. ते म्हणतात- ‘कुटुंबसौख्या विषयी विचार करताना मला असे वाटू लागले आहे की, ज्याच्या योगानं घरातील सर्व व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामात गुंतल्या असतील, किंवा वैयक्तिक कष्टसाध्य महत्त्वाकांक्षेच्या मागे लागल्या असतील त्या कुटुंबात सौख्य साधारणपणे अधिक असते. तसेच मिस कोहन यांचे पाणिग्रहण करताना डॉ. केतकर यांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा हिंदू मिशनरी संस्थेकडून न देववितां व्रात्यस्तोमविधीने देवविली आणि हिंदू समाजशास्त्राच्या आपल्या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात करून दाखविला, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. असो. ११

‘ज्ञानकोशमंडळाचा इतिहास', पृष्ठ ८८