पान:आमची संस्कृती.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ७९

मध्यम वर्गावरून आपली दृष्टी यशस्वी रीतीने ब्राह्मणेतर मध्यम वर्गाकडे वळवली आहे; व एकाच गावामधील ह्या दोन समाजातील व्यक्तींचा त्या त्या समाजाच्या सीमारेषेवर कसा संबंध येतो ते दाखविले आहे.समाजशात्रदृष्ट्या ह्या कादंबरीत त्यांनी रंगविलेले मध्यम स्थितीतील ब्राह्मणवर्गाचे चित्र अमोल आहे‘विचक्षणा' कादंबरीत विवाहसंस्था वेश्यांचे सामाजिक स्थान ह्या विषयांचा विचार केला आहे. आतापर्यंतच्या सर्व मराठी कादंबच्यांतून व गोष्टीतून वेश्येचा उपयोग कथानक हृदयस्पर्श करण्याकडे केलेला दिसतो. काहींनी गृहस्थी कुटुंबाची वेश्याव्यवसायामुळे होणारी धूळधाण वर्णिली आहे, तर काहींनी वेश्या व त्यांची संतती ह्यांना आपला व्यवसाय सोडून गृहस्थाश्रमी बनण्यास कोणत्या सामाजिक अडचणी उत्पन्न होतात व त्यामुळे सदगुणी वेश्यापत्यांची कशी कुचंबणा होते हे दाखविले आहे. हा दुसरा प्रकार दर्शविण्याची टूम विशेषत:श्री. पु. य. देशपांडे ह्यांच्या बंधनाच्या पलीकडे’ ह्या कादंबरीपासून तरुण लेखकांनी उचलली आहे; व मागील पिढीत विधवांना वाङ्मयात जे स्थान होते ते आता वेश्यांना मिळू लागले आहेकेतकरांनी हा सोपा राजमार्ग टाकून आपली तीक्ष्ण शोधक बुद्धी ह्या प्रश्नाचे समाजशास्त्रदृष्ट्या विवेचनकरण्याकडे खर्चिली आहे. लोकानुरंजनजीबी कलावंतवर्गाला पिढीजाद कलोपासना न सोडता आपली कशी उन्नती करता येईल, व एकेका व्यक्तीला नव्हे तर सबंध वर्गालाच आपले सामाजिक स्थान बदलण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ह्याबद्दल सांगोपांग चर्चा ह्या कादंबरीत केली आहे. तिच्या अनुषंगाने विवाहबाह्य स्त्री-पुरुष संबंधांना समाजात काय स्थान असावे ह्याचाही विचार केतकरांनी केला आहेआपल्या कादंबच्यांतून त्यांनी जे सिद्धांत प्रतिपादिले आहेत ते लोकांना पटोत वा न पटोत, पण हिंदू समाजाचे सध्याचे स्वरूप व हिंदूचे सामाजिक प्रश्न ह्यांवर केतकरांची कादंबरी विचार करावयास लावते व प्रत्येक प्रश्नावर विधायक स्वरूपाच्या सूचनाही करते.
 केवळ कादंबर्यांतून नव्हे, तर आपल्या निरनिराळ्या आत्मकथमपर लेखनातूनही डॉ. केतकर यांनी आपली दृष्टी व्यापक व समाजशास्त्रज्ञास साजेशीच ठेवली आहे. आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग जेव्हा ते वर्णितात, तेव्हा आपण त्या प्रसंगी अनुभविलेल्या सुख-दु:खाचे हुबेहूब वर्णन करून वाचकांच्या मनात सहसंवेदना उत्पन्न करण्याचा त्यांचा हेतू नसतो, तर