पान:आमची संस्कृती.pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / ८१

 समाजशास्त्र हे मानवसमाजाइतके प्राचीन असले, तरी स्वतंत्र एक शास्त्र ह्या दृष्टीने त्याचा पद्धतशीर अभ्यास गेल्या शतकातच प्रथम सुरू झाला. ह्या शास्त्राच्या मर्यादा स्पष्टपणे आखताच येत नाहीत:कारण, मानवसमाजाच्या प्रारंभापासून आतापर्यंत मनुष्याच्या सर्वच व्यापारांचे ह्यांत परीक्षण करावयाचे असते.पूर्वी होऊन गेलेल्या मनुष्यसमाजांचा इतिहास, हल्ली जगात आढळणाऱ्या सुसंस्कृत व असंस्कृत समाजांचे निरीक्षण, आणि भविष्यकाळी मनुष्यसमाजाचे स्वरूप असेल व असावे ह्याविषयी चर्चा इत्यादी गोष्टीचा ह्या एका शास्त्रात समावेश होतो.
 केतकरांनी आपल्या ग्रंथांतन प्राचीन सुसंस्कृत समाजाचा इतिहास लिहिलेला आहे आणि विशेषकरून प्राचीन भारतीयांची वैदिक संस्कृती अभ्यासताना तिच्यापूर्वी मिसर व असीरिया देशांतील संस्कृचा विचार केला आहे. त्यांनी सध्याच्या हिंदू समाजाचे मार्मिक परीक्षण ‘हिंदुस्थान आणि जग’ ह्या ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडात केले असून हिंदू समाजाची पुनर्घटना कोणत्या स्वरूपाची असावी ह्यासंबंधीचा उहापोह 'Hindustan : its Formation and Future' व 'भारतीय समाजशास्त्र ह्या पुस्तकांतून केला आहे.
 अशा तहेच्या विस्तीर्ण विषयाचा अभ्यास करणार्यास दृष्टी एकमागी ठेवून चालत नाही. केतकर हे एक जातिवंत समाजशास्त्रज्ञ होते. त्यांची दृष्टी विशाल-एकाच वेळी विविध समाजांचे आकलन करण्यास योग्य अश तर होतीच, पण लहानसहान सामाजिक गोष्टींपर्यंत पोचण्याइतकी ती तीक्ष्ण व शोधकही होती. त्यांची पुस्तके वाचीत असता त्यांच्या तळटीपांतून व पुस्तकाला जोडलेल्या परिशिष्टांतून ही बुद्धीची तीव्रता व एका विषयावरून सुचलेले विचार दुसर्या विषयाला लावण्याची हातोटी दिसून येते. ‘History of Castes in India,'Vol.1 ह्या पुस्तकात (पृष्ठ ४८) त्यांनी मनूच्या तीन टीकाकारांची तुलना केली आहे व कोणाची टीका अधिक ग्राह्य आहे ते ठरविले आहे.

 निन्द्यास्वष्टासु चान्यासु स्त्रियो रात्रिषु वर्जयन।
 ब्रह्मचर्येय भवतेि यत्रतत्राश्रमे वसन।। मनु अ.३/५०