पान:आमची संस्कृती.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७८/ आमची संस्कृती

कोणत्याही समाजातील व्यक्तींवर येऊ शकतील, तसेच त्यांचे मनोव्यापार दुसऱ्या कोणत्याही व्यक्तींवर लादता येतील असे असतात. पण केतकरांच्या कादंबर्यांतील स्त्री-पुरुषांना असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाही. त्या सर्व एका विशिष्ट कालातील व्यक्ती असतातकेतकर केवळ स्त्री-पुरुषांचे परस्पर संबंध दर्शवून थांबत नाहीत तर व्यक्ती व सभाज हे द्वंद्व ते अतिशय मार्मिकतेने रंगवितात. व्यक्तीला आपल्या आकांक्षा पुरविण्याला समाजाची गरज लागते, पण समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याला घातलेले बंधन नको असते. व्यक्ती व समाज ह्यांचे संबंध वयात येणारी मुले व आईबाप ह्यांच्या संबंधांसारखे काहीसे असूया, ईर्षा व प्रेम ह्या परस्परविरोधी भावनांनी बनलेले असतात; आणि प्रायः व्यक्तीला समाजाच्या बंधनांना झिडकारून टाकून आपल्या आकांक्षा पूर्ण करता येत नाहीत, असेच केतकरांच्या एकंदर कादंबर्यांतून दर्शविलेले आहे. त्यांच्या कादंबन्या म्हणजे समाजवर्णनाचे मूल्यवान नमुनेच आहेत. गांवसासू' कांदबरी हे हिंदुस्थानात नोकन्या मिळविणाच्या हिंदू नोकरशाहीच्या विलायतेत बनलेल्या समाजाचे अत्यंत मार्मिक चित्र आहे आय.सी.एस. व इतर परीक्षांसाठी हिंदुस्थानातून जाणारे विद्यार्थी, त्यांना जाळ्यांत अडकविण्याचा प्रयत्न करणाच्या सेवानिवृत्त आय.सी.एस. लोकांच्या मुलींच्या माता, वरिष्ठ व बड्या पगाराच्या नोकन्या करणारी हिंदुस्थानभर परसलेल्या हिंदू नोकरशाहीची एक नवीन बनू पाहणारी जात इत्यादी गोष्टी ह्या कादंबरीत चित्रित केल्या आहेत. पुढील कादंबन्यांत दिसून येणारी समाजशास्त्रविषयक चिकित्सा ह्या कादंबरीत प्रामुख्याने दिसून येत नाही; पण हीतही समाजशास्त्रज्ञाची त्यांची भूमिका त्यांनी रंगविलेल्या विनोदगर्भ व्यंगचित्रात स्पष्ट होतेह्या दृष्टीने ‘ब्राम्हणकन्या' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. मध्यम स्थितीतील शिकलेला ब्राह्मणवर्ग, त्यांतूनही समाजसुधारणा म्हणून त्यांपैकी काहींनी स्वीकारलेला मार्ग व पुढील त्याच्या पिढीपुढे आलेला प्रश्न, हे ह्या कादंबरीतील मध्यवर्ती कथानक आहे. सुधारक आईबापांच्या संततीला समाजात स्थान कोणते आणि आईबापांनी ज्या समाजाला झिडकारले त्या समाजात मानाची जागा मिळविण्याची त्यांनी आकांक्षा धरणे म्हणजे निराशा पदरी बांधून घेणे होय हे दाखवून, अशा संततीने कोणता मार्ग चोखाळला असता तिला तो कल्याणप्रद होईल याचा चर्चा केतकरांनी केलेली आहे. ह्या कादंबरीत डॉ. केतकर यांनी ब्राह्मण