पान:आमची संस्कृती.pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ७७







 ७. डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन



 डॉ. केतकरांचे समाजशास्त्रविषयक लेखन त्यांच्या सर्वच ग्रंथांतून पाहावयास सापडते. किंबहुना त्यांनी पीएच.डी.साठी लिहिलेल्या निबंधापासून तो अगदी शेवटी 'स्त्री' मासिकात लिहिलेल्या 'विचक्षणा कादंबरीपर्यंतचे त्यांचे सर्व लेखन प्राय: समाजशास्त्रावरच आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
 'गांवसासू' ब्राह्मणकन्या' व 'विचक्षणा' ह्या कादंबच्या त्यांच्या कादंबरी लेखनकालातील प्रारंभ, मध्य व अंत दाखवितात; आणि या तिहींतही मध्य स्थितीतील हिंदू समाजाची तीन चित्रे आपल्याला पाहावयास सापडतात. त्यांच्या कादंबच्या म्हणजे समाजशास्त्रावरील सोदाहरण निरुपणेच होत. त्यांतील व्यक्तींवर आलेले प्रसंग त्या व्यक्तींपुरतेच मर्यादित नसतात, तर त्या सर्वांत गर्भित अर्थान्तरन्यास असतो. एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीच्या कोंदणात असलेल्या व्यक्तीच्या हालचाली व मनोव्यापार ह्या दृष्टीने त्या व्यक्तींचे आयुष्य चितारलेले असते; आणि त्या विशिष्ट चित्रांत व्यक्ती व समाज ह्यांच्या अन्योन्य संबंधांचे सामान्य नियम सूचित केलेले असतात.
 हल्लीच्या कादंब-यांतून विशिष्ट व्यक्तींचे परस्पर संबंध व सूक्ष्म मनोविश्लेषण पाहावयास मिळते. त्या व्यक्तींवर आलेले प्रसंग दुस-या