पान:आमची संस्कृती.pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२० / आमची संस्कृती

 अशी ही संस्कृतीची अखंडित परंपरा हिंदुस्थानाखेरीज फक्त चीन व जपान या पौर्वात्य देशांतच काय ती आढळते. युरोप, आफ्रिका वगैरे इतर भूविभागांत ही प्राचीन परंपरा खंडित झालेली आढळते. या देशांतून प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडत नाहीत असे नाही; युरोपातील जुने अवशेष आज आइसलँडसारख्या दूरच्या प्रदेशात आढळतात. आजच्या युरोपातील लोक केवळ जिज्ञासेने त्यांचे संशोधन करतात. तेथे उपलब्ध होणारी टयुटॉनिक गाणी ते उतरून घेतात. पण या सर्वात त्यांस आत्मीयता नसते. हे जे आहे ते 'आपले' आहे ही भावना त्यांच्या ठिकाणी आढळत नाही. रोम आणि ग्रीक पुराणातील कथा, देवता इत्यादींची माहिती उपलब्ध असली, तरी त्यांचे संस्कार ख्रिस्ती-धर्मीय आधुनिक युरोपच्या जीवनात दिसून येत नाहीत. या पुराणकालीन संस्कृतिचिन्हांविषयी त्यांस कुतूहल असले तरी आपलेपणा असलेला आढळून येत नाही.
 खंडित परंपरेचे दुसरे ठळक उदाहरण महंमदी धर्माच्या वर्चस्वाखालील आजच्या इजिप्तचे देता येईल. तेथे आढळणारे ते मोठमोठे पिरामिड म्हणजे फॅरोहासारख्या राजाची थडगी, त्यात हजारो वर्षे जतन करून ठेविलेल्या 'ममी', 'स्फिंक्स'चा अजस्र पुतळा ही प्राचीन इजिप्शियन संस्कृतीची चिन्हे आजही उपलब्ध आहेत. परंतु फॅरोहासारखे राजे, शेजा, क्लिओपाट्रासारख्या राण्या, त्यांच्या वेळच्या कथा, चित्रे भांडी यांचे प्रतिबिंब आजच्या महंमद-धर्मानुयायी इजिप्तमध्ये कितीसे आढळते? त्याविषयी त्यांस आत्मीयता वाटते काय? प्राचीन काळी हा देश फार पुढारलेला, सुसंस्कृत होता असे म्हणताना आधुनिक इजिप्शियन मनुष्याचे अंत:करण आपलेपणाच्या भावनेने उचंबळून येत नाही. हे सर्व आपल्यापासून दूर, वेगळे, जुने, दुसयाचे आहे, ही भावना आजच्या तेथील लोकांत आढळते.
 ख्रिस्ती व महंमदी धर्माचे वर्चस्व जेथे जेथे प्रस्थापित झाले तेथे तेथे अशा तऱ्हेची खंडित परंपरा आढळते. पूर्वजांच्या स्मृतिचिन्हांविषयी आजच्या लोकांस आपलेपणाचा अभिमान असलेला दिसून येत नाही.
 यांच्याबरोबर चीन-जपान किंवा हिंदुस्थान येथील संस्कृतीचा इतिहास ताडून पाहिला, तर येथील परंपरा आज पाच हजार वर्षे अखंडित चालत आलेली दिसते. पूर्वजांचे ग्रंथ, त्यांचे पोषाख, त्यांची दैवते,