पान:आमची संस्कृती.pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.१७४ / आमची संस्कृती

 टर्मबाबतचे नियम किती विद्यार्थी पाळतात?

वर्ग विद्यार्थ्यांची संख्या अटी पाळून संख्या टर्म मिळवलेले अटी न पाळलेले पैकी ज्यांना मेहेरबानीने टर्म मिळाले टर्म न मिळालेले
ज्यु.बी.ए. ४२६ २०८ २१८(५१%) १९८ २०
ज्यु.एम.ए. ११३ ४६ ६७(५९.५) ३७ ३०
ज्यु.बी.एस्सी ३८७ १५२ २३५(६१%) १७२ ६३
ज्यु.एम.एस्सी १७ १० ७(४१%) -

 एका ज्युनिअर एम.एस्सी. वर्षाखेरीज अटी न पाळणाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. विद्यार्थ्यांना लेक्चरे ऐकण्यास सोपे जावे म्हणून एम.ए.ची सर्व लेक्चरे सकाळी ठेवली आहेत. एम.ए.ची फी दोन वर्षे मिळून रुपये ४०० व एम.एस्सी.ची रु. ६००. एवढे पैसे भरून युनिव्हर्सिटीच्या सर्वोच्च परीक्षांना बसणाच्या विद्यार्थ्यांची ही अनास्था भयानक नाही का? इतक्या विद्यार्थ्यांना खाली ठेवायचे कसे म्हणून त्यातील ब-याच जणांना टर्म दिली आहे. हेच उनाड विद्यार्थी वर्षाच्या शेवटी रात्रीचे दिवस करून अभ्यास करून परीक्षा देतात व इतके गचाळ पेपर लिहिलेले विद्यार्थी पास कसे करावे हा प्रश्न पडतो. त्याचबरोबर इतक्यांना नापास तरी कसे करायचे हा प्रश्न येतो. मग ते पास होतात व दुर्दैवाने शिक्षक म्हणून शाळा कॉलेजांत शिकवावयास येतात.

 वर्ष फुकट गेल्यावर-
 युनिव्हर्सिटीच्या परीक्षांना बसून नापास झाला म्हणजे विद्यार्थी व पालक ह्यांना काही करता येत नाही. पण पहिल्या वर्षाची परीक्षा म्हणजे घरची. त्यात आधी परीक्षा घेऊ नये व घेतलीच तर नापास करू नये अशी ब-याच जणांची अपेक्षा असते.
 खरोखरच पास होऊ नयेत असे कितीतरी विद्यार्थी पास केले जातात. यंदा एका कॉलेजात पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या