पान:आमची संस्कृती.pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १७५

विद्यार्थ्यांपैकी शेकडा ७५ पास केले. त्यांतील जवळजवळ ५० टक्के नीट सर्व विषयांत पास झालेले होते व २५ टक्के निरनिराळ्या विषयांत नापास झालेले पण वर्षाचा अभ्यास व तिमाही वगैरे परीक्षांचे मार्क वगैरे बघून वर चढवलेले होते. उरलेले २५ टक्के जे नापास झाले ते एक तर दोन-तीन विषयांत तरी नापास झालेले किंवा एका विषयात अतिशय मार्कांनी गेलेले व इतर विषयांत पण जेमतेम मार्क मिळालेले असे होते. ह्या कॉलेजचा इंटर आर्टसचा व इंटर सायन्सचा रिझल्ट गेल्या वर्षी अनुक्रमे ६० व ७५ टक्के लागला होता व तसाच पुढे लागेल असे धरले म्हणजे पहिल्या वर्षी पास म्हणून वर घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी नापास होऊन वर गेले होते तेच बहुतांशी एक वर्ष कॉलेजची फी भरून, परीक्षेची फी भरून, नापास होणार हे स्पष्टच दिसते. वर्ष फुकट गेले ही हळहळ आता वाटते व म्हणून वर घालण्याची जी धडपड, ती कशी व्यर्थ जाते हे ह्यावरून दिसून येईल. त्यापेक्षा कच्च्या विषयाची शिकवणी घेऊन तो समजून घेऊन एका वर्षाने बसले तर चांगले; वर येण्याची शक्यता असते. अभ्यास समजल्यामुळे इंटरच्या वर्षातही नीट पास होऊन डॉक्टरीकडे किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्यास लागणारी श्रेणी मिळण्याचीही शक्यता वाढते.
 पण टर्म भरावयाचे निरनिराळे नियम मोडूनही टर्म कशी भरता येईल यातच ब-याच जणांची बुद्धी खर्च होते. सर्व उपाय थकले म्हणजे आजारीपणाचे सर्टिफिकेट देणारे डॉक्टर भेटतात. अशा त-हेचे सर्टिफिकेट मागण्यात आपण काही गैर करतो असे वाटतच नाही व सर्टिफिकेट देणा-या डॉक्टरनाही काही वाटत नाही. काही मुलांनी तर डॉक्टरांची खोटी सही करून पत्रके तयार केलेली आहेत.
 श्रीमंत आईबापांना तर असल्या क्षुल्लक कारणांसाठी मुलाला अडकवून ठेवल्याचे आश्चर्य वाटते. 'अहो, तिमाही, सहामाहीचं काय सागता! त्यांत नापास झाला तर त्याचे काय? मूल आहे, उनाडणारच. आता पाहा तो अभ्यास करील व नक्की पास होईल' असे कित्येक पालकांनी हसत सांगितले.
 अपराधी आम्हीच?
 ‘वर्ष बुडवणे, अडवून ठेवणे, निराश करणे,' ही वाक्ये ऐकून आपण