पान:आमची संस्कृती.pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६८ / आमची संस्कृती

कदाचित कसाबसा पास होईल! पण साधारणपणे परीक्षेचा निकाल वर्षाच्या कामाच्या अनुरूप असतो असे दिसते. म्हणजे सध्याच्या परीक्षापद्धतीने विद्यार्थ्यांवर अन्याय होतो हे म्हणणे बरोबर नाही. त्यांतील दोष दुसरे आहेत. परीक्षा कशा असाव्यात ह्याबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षक ह्यांची प्रत्येकाची कल्पना निरनिराळी असते. विद्याथ्र्याला वाटते की, अभ्यासाची पुस्तके शक्य तितकी कमी असावीत, व त्यांतलाही जो कमीत कमी भाग वाचून पास होणे शक्य आहे तो शिक्षकांनी दाखवून द्यावा. पालकाने बहुधा विचार केलेलाच नसतो. एकदा मुलगा-मुलगी पास होऊ दे, म्हणजे झाले असे त्याला वाटते. आम्हांला म्हणजे शिक्षकांना वाटते, शिकविलेल्या विषयाचे जास्तीत जास्त ग्रहण केले अशी खात्री पटावी.
 सध्याच्या परीक्षा बहुधा वर्षाच्या किंवा दोन वर्षांच्या शेवटी असतात. व त्या वेळी सर्व विषयांची एकदम परीक्षा होते. परीक्षेचे पासाचे मार्क साधारणपणे शेकडा ३३ असतात. दुस-या शब्दांत सांगावयाचे म्हणजे शिकवल्यापैकी २/३ कळले नाही तरी मुलगा पास होतो. हे योग्य वाटत नाही.

 सध्याच्या परीक्षापद्धतीतील दोष
 सध्याच्या परीक्षापद्धतीचा दोष म्हणजे तीवरून नीट चाचणी होत नाही, हा मुख्यत्वे नसून तीमुळे मुलांना अभ्यासाची सवय लागत नाही व सर्व विषय एका वेळी तयार ठेवण्याचा ताण पडतो असे दोन आहेत. 6 दोन्ही दोष परस्परसापेक्ष व परस्परपूरक आहेत. मुख्य परीक्षा वर्षाशिवटा किंवा दोन वर्षांशेवटी आहे, ह्या भावनेने विद्यार्थी प्रथम अभ्यास करात नाही. अगदी गळ्याशी आले म्हणजे दुस-याने चावून मऊ करून दिली अन्न खावे त्याप्रमाणे नोटस्, प्रश्न व त्यांची उत्तरे एवढेच बघून कसाब पास होतो. सारखा थोडाथोडा पण अखंड अभ्यास, वाचन, मनन व लेखन ह्याची सवय लागत नाही. शिकलेले विषय उत्तम व उपयोगी असूनही त्यांची गोडी लागत नाही. जिथे नोटसूवरच भागवून नेतात तेथे पाठ्यपुस्तकांचे वाचन होत नाही हे सांगणे नलगे. मग बाहेरच्या आनुषंगिक वाचनाबद्दल तर विचारावयास नकोच.