पान:आमची संस्कृती.pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १६७

 कष्टाशिवाय फळाची अपेक्षा!
 कर्मविपाक व कर्मफळाची कल्पना हा हिंदु संस्कृतीचा गाभा म्हटला तरी चालेल. आज सर्वांनाच त्याचा विसर पडलेला आहे. पण सरसकट कर्माप्रमाणे फळ ही साधी गोष्ट समजेनाशी झाली आहेकष्ट न करता पैसे कसे मिळतीलशक्य तितके कमी काम करून बढती कशी मिळेल, अभ्यास न करता पास कसे होऊ- ह्याच विवंचनेत जो तो असतो. बरे, अभ्यास केला नाही, कॉपी केली, तर नापास होणे, किंवा त्याच वर्गात राहणे ही शिक्षा भोगावयाची मनाची तयारी नसते. ‘मी अभ्यास केला होता, पण आकसाने मला नापास केले, किंवा यंदा पेपरच जड होते. अशी भाषा मग सुरू होते. कॉपी केलेले विद्यार्थी दरवर्षी येतात. यंदा चुकले, आम्हांला पास करा, पुन्हा असे वर्तन करणार नाही,’ असे सर्वांचे म्हणणे असते. कॉपी करणाराचे खरोखर दोन अपराध असतात. एक अभ्यास न केल्याचा व दुसरा चोरी केल्याचा. पण त्याला वाटते, जरी अपराध केला तरी लोटांगण घातले की शिक्षा मिळू नये. विद्यार्थीदशेत खरोखरच कामाचा वेळ थोडा असतो. बराच वेळ सुट्टीचा व खेळण्याचा असतो. कामाच्या वेळी मन लावून, झटून अभ्यास करणे हे कर्तव्य आहे असे बहुसंख्य मुलांना वाटत नाही. पास व्हावयाची इच्छा प्रत्येकाला असते, पण ते साध्य होण्यास कष्ट हेच एक साधन आहे हे कळत नाही. परीक्षेला दोन महिने राहिले की, दिवे जाळण्यास सुरुवात होते. लायब्ररीतल्या चूकांवर सर्वांची धाड पडते. मग पाळ्या सुरू होतात व कोणाचेच वाचन नीट मननपूर्वक होत नाही. वर्गात जसजसा अभ्यास होतो, तसतसे वाचन व टाचणे करीत गेल्यास शरीराला व मनाला अभ्यासाची व व्यवस्थितपणाची सवय लागेल व ह्याच सवयी पुढच्या आयुष्यात स्वत:च्या व राष्ट्राच्या उन्नतीला उपयोगी ठरतील.
 परीक्षापद्धतीचा दोष म्हणावा तर ह्या एका उदाहरणावरून निदान एवढे तरी सिद्ध होते की, विद्यार्थ्यांची अभ्यासाची चाचणी ह्या दृष्टीनेच नुसता विचार केला तर परीक्षेचा निकाल जवळजवळ आधीच ठरल्यासारखा दिसतो. म्हणजे चाचणी बहुतेक बाबतीत योग्य होते असे म्हणण्यास हरकत नाही. प्रथम श्रेणीचा विद्याथ क्वचित द्वितीय श्रेणीत येईल; अभ्यास न केलेला एखादा विद्यार्थी दोन महिने रात्रीचे दिवस करून