पान:आमची संस्कृती.pdf/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१६२ / आमची संस्कृती

एकमेव कार्यक्रम शिक्षण अशी भूमिका असते. इंग्रजांच्या राज्यामुळे आपणही खेळांना अभ्यासक्रमात घुसडून दिले आहे. इंग्रजांचे खेळ थोडेच आहेत व त्यामुळे असल्या सामन्यात त्यांचा फार वेळ जात नाही. शिवाय इंग्लंडमधील सर्व शाळा व कॉलेजे ह्यांचे सामने चालत नाहीत. पण आपण मात्र क्रिकेट, टेनीस, बॅडमिंटन, पिंगपाँग ह्यांशिवाय हुतूतू, खोखो, आट्यापाट्या, कुस्ती व इतर वैयक्तिक खेळ ह्या सर्वांचेच सामने करतो व ते एका विद्यापीठाच्या सर्व कॉलेजांचे; ह्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि कॉलेज व विद्यार्थी ह्यांचा पैसा फार खर्च होतो.
 विद्याथ्र्यांनी शाळेत अगर कॉलेजात असताना खेळ, वक्तृत्वाच्या चढाओढी, बॉय-स्काउट, नॅशनल कॅडेट कोअर इत्यादी प्रकारच्या निरनिराळ्या अभ्यासेतर चळवळीत किती वेळ घालवावा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातूनही पहिल्या टर्ममध्ये काही ठिकाणी पावसाळा व काही ठिकाणी उन्हाळा असल्यामुळे खेळांचे सामने बहुतेक दुस-या टर्ममध्येच होतात. जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांत निदान विद्यापीठात तरी हे। खेळांचे बंड नाही. शनिवार-रविवारी विद्यार्थी पायपिटीला, होडीतून सहल करण्यास किंवा काही खेळ खेळण्यास जातात. पण अभ्यासाच्या दिवसांत विद्यार्थी सामने खेळण्यास गेले आहेत ही गोष्ट तेथे प्रत्येकाला चमत्कारिक वाटेल. जर्मन विद्यापीठातील प्रत्येक प्राध्यापक-मुख्यापासून दुय्यमापर्यत आपले संशोधन, अध्यापन, लेखन, वाचन ह्यांत गुंतलेला असतो. अर्थात तोही रविवारी अगर उन्हाळ्या-हिवाळ्याच्या सुट्टयांत पायी प्रवास, पोहणे, खेळणे, बर्फाचे खेळ खेळणे ह्या गोष्टी करतो. पण एकदा टर्म सुरू झाली की, मग ह्या सर्व गोष्टी बंद. विद्यार्थ्यांच्या अभ्यासेतर जीवनाशी अध्यापकांचा फारच थोडा संबंध येतो. एकंदरीतच इंग्लंडच्या वरवर पाहून केलेल्या नकलीमुळे आपण विद्यापीठात खेळांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे आणि खेळ किंवा व्यायाम ही साधने शरीरस्वास्थ्य, तरतरी, उत्साह यांची साधने आहेत; साध्ये नव्हेत है विसरलो आहो. विद्यापीठातील जीवनाचे मुख्य साध्य ज्ञान मिळवणे, शील बनवणे हे आहे व त्याकरिता सपाटून अभ्यास करणे जरूर आहे हे सर्वांनी ओळखले पाहिजे. परिस्थिती मात्र अशी आहे की, जर एका कोणत्या गोष्टीचा विद्याथ्र्यांना कंटाळा असेल तर तो अभ्यासाचा. अभ्यास करावा