पान:आमची संस्कृती.pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२४ / आमची संस्कृती

 भारतात हिंदी भाषेला असे स्थान मुळीच नाही. वर वर्णन केलेल्या कोणत्याही राज्यासारखी भारताची परिस्थिती नाही. गेल्या ९०० वर्षांतील काही घडामोडींचा थोडक्यात उल्लेख केल्यास भारतीय भाषांबद्दलचा प्रश्न स्पष्ट होण्यास आणखी मदत होईल.
 इसवी सन ९०० ते १००० च्या सुमारास अर्वाचीन उत्तरभारतीय संस्कृतोद्भव भाषा प्राकृतांतून वेगळ्या फुटल्या व त्यांचा जन्म झाला, हे वर सांगितलेच आहे. तरीसुद्धा संस्कृत ही विद्वानांची भाषा राहिली व साहित्य, संगीत, ज्योतिष व तत्त्वज्ञान ह्यांवर उत्तम लिखाण संस्कृतमध्ये होतच होते. अर्वाचीन भाषा हळूहळू बाळपण संपवून प्रौढ होत होत्या. काही तीनशे वर्षांतच प्रौढ दशेला पोचल्या हे महानुभावांच्या वाङमयावरून व ज्ञानेश्वरी व अमृतानुभवासारख्या ग्रंथांवरून दिसून येतेच. ह्या भाषांच्या जवळजवळ जन्ममुहूर्तावरच एका धर्मवेड्या परकीय सत्तेने भारतात प्रवेश केला. सन नऊशे-दहाशेच्या सुमाराची आक्रमणे सोडली तरी ११०० च्या सुमारास तुर्की लोकांनी हिंदुस्थानात प्रवेश करून मुसलमानी धर्म व पर्शियन भाषा व संस्कृती आणली. पहिल्यापहिल्याने लूट घेऊन निघून जाणारे हे लोक लौकरच जेते म्हणून स्थायिक झाले व आपला धर्मप्रसार त्यांनी जोरात सुरू केला. त्यांच्या दरबारी पर्शियन भाषा चाले व उत्तरप्रदेशातील लोकांनी ती भाषा आत्मसात केली व हिंदी मार्ग पडली. दक्षिणेकडे ह्या आक्रमणाला तोंड देण्यात इतके सामर्थ्य खर्च झाल की, त्यामुळे देशी भाषांची जरी गळचेपी झाली नाही तरी सर्वांगीण वाढ झाली नाही.
 हिंदुस्थानातील काही प्रांत मुसलमानी अंमलाखाली ७०० वर्षे होते, तर काही २०० पेक्षा जास्त नव्हते. इंग्रज येण्याच्या अगोदर काही प्राताना मसलमानी अंमल झुगारून दिला होता व त्या त्या प्रांतात देशी भाषा वाङमयीनष्ट्या परत डोके वर काढू लागल्या होत्या. पण सर्वांगीण वृद्धा व्हावयास जी राजकीय सत्ता व स्वास्थ्य लागते ते आजपर्यंत ह्या भाषांना मिळाले नाही.
 इसवी सनाच्या १६ व्या शतकात दक्षिणेकडील मुसलमानी राजाच्या दरबारात ऊर्दू भाषेतून वाङमयनिर्मिती होऊ लागली. ऊर्दू ही मूळ दिल्लीच्या आसपासच्या लोकांची बोलभाषा, म्हणजे हिंदी भाषेच्या