पान:आमची संस्कृती.pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १०३




९. नवीन हिंदू कायद्याचे समाजशास्त्रदृष्ट्या परीक्षण


 नुकत्याच पुण्यात येऊन गेलेल्या हिंदू कायदा समितीपुढे मी साक्ष दिली, त्यांत प्रतिपादन केलेल्या काही मुद्यांबद्दल बराच गैरसमज पसरला आहे असे दिसून आल्यावरून माझ्या मताचे स्पष्टीकरण करण्यासाठी खालील चार शब्द लिहीत आहे.
 हिंदू समाजाच्या कौटुंबिक जीवनाचे स्वरूप काय असावे, त्यांतील स्त्री-पुरुषांची, मुख्यत्वेकरून मिळवत्या पुरुषांची, जबाबदारी काय असावी वगैरे गोष्टींचा विचार जरी ह्या कायद्यात प्रत्यक्ष केला तरी अप्रत्यक्षरीत्या वरील प्रश्नांबद्दल ज्याप्रमाणे व्यक्तीचे मत असेल त्याप्रमाणे ह्या नवीन होऊ घातलेल्या कायद्याबद्दल मत असणार हे अगदी उघड आहे. जी काही मते प्रतिपादन करावयाची ती एकेका कलमापुरती मर्यादित नसून सर्व सामाजिक व कौटुंबिक जीवनाचा विचार करूनच बनविलेली असतात व त्याच दृष्टीने पुढील विवेचन केलेले आहे.
 अगदी पहिला मुद्दा असा आहे की, सर्व हिंदुस्थानभर पसरलेल्या कानाकोप-यांतल्यासुद्धा, स्वत:ला हिंदू म्हणविणाच्या लोकांविषयी हा कायदा आहे. अगदी स्मृतिप्रणीत रूढी घेतली तरी तीसुद्धा प्रांताप्रांतातन निरनिराळी आहे व स्मृतीत त्याज्य गणलेल्या गोष्टी हिंदुस्थानांतील काही प्रांतांतून सर्व जाती करतात. अशा परिस्थितीत हिंदुस्थानातील सर्व प्रांतांना