पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[६] आणि याच जातीच्या नांवानें आपला एकंदर सर्व व्यवहार चालला आहे; यापेक्षां मला अधिक कांहीं माहिती नाहीं. सरकारानें पुण्यांतील जातींचा इतिहास शोधून लिहून काढण्याकरितां आणि तो पुढें ग्याझिटीअर पुस्तकांत छापून प्रसिद्ध करण्याकरितां जो एक कामदार नेमला होता, त्यालाही मी अशीच माहिती दिली होती. मी त्यांना दुसरा प्रश्न असा विचारला कीं, “आपल्या जातिसंबंधानें कांहीं लेख, आधार, वगैरे आहेत काय? ” तेव्हां त्यांनी “नाहीं" असेंच उत्तर दिलें. मी पुन्हा त्यांना असा प्रश्न केला की, "आपल्या जातीच्या आधाराविषयी आपणांस शोध कसा लागावा ? " तेव्हां त्यांनी मला असे उत्तर दिलें कीं, “राजपुतान्याकडील चारण भाट आणि बडवे यांच्या चोपड्यावरून माहिती मिळण्याचा संभव आहे. " मी त्यांना " कुमावत' " या जातिवाचक शब्दाचा अर्थ काय आहे ? असे विचारले, तेव्हां ते ह्मणाले कीं, “मला कांहीं ठाऊक नाहीं. " शेवटीं, ते मला असे म्हणाले की, “आपल्यासारख्या शोधक- बुद्धीच्या तरुणानें आपल्या जातीची सविस्तर माहिती लिहून ठेवल्यास फार उत्तम होणार आहे. " " हिंदु जातिसंबंधीं शोध करणारें Ethnographical Survey of India या नांवाचें कलकत्ता येथें जें मुख्य ऑफिस आहे त्याचे सुपरिंटेंडंट रा. ब. बाळकृष्ण आत्माराम ऊर्फ भाईसाहेब गुप्ते, बी. ए., हे आहेत; त्यांचा आणि माझा साधारण परि- चय आहे. त्यांचेकडून मला असे एक पत्र आलें होतें कीं, “ आम्हाला तुमच्या जाती- संबंधी बरोबर माहिती सांपडत नाहीं; यासाठीं तुह्मांस कांही माहिती ठाऊक असल्यास ती इकडे पाठवून देण्याची मेहरबानी व्हावी. ” माझे पुण्यांतील स्नेही रा. रा. त्रिंबकराव वासुदेव ऊर्फ तात्यासाहेब गुप्ते, वकील, Ethnographical Notes on Chandraseniya Kaysatha Prabhu या ग्रंथाचे कर्ते, हे नेहमीं मला असे ह्मणत असत कीं, " तुमची जात विद्येत फारच मागसलेली आहे; आणि ती अज्ञानांधकारामध्यें पडलेली आहे. तिला पुढे आणण्याकरितां प्रयत्न न करणे ही मोठीच चूक होय. तुमची जात ही उद्योगधंद्यानें श्रीमान्, दानशूर आणि सुखी अशी आहे. तुमच्या ज्ञातीमध्यें मोठमोठे कंट्राक्टर आहेत, त्यांनीं गरिबांच्या होतकरू मुलांना मदत करून पुढे आणले पाहिजे. तुमच्यामध्यें विद्या नसल्याकारणामुळे तुमचे लोक जातजेवणे घालण्यांत आणि शिमग्यांतील नाच, रंग, तमाशे करण्यांत आपल्या पैशाचा चुराडा उडवितात; असा त्यांचा लौकिक आहे. हा खर्च व्यर्थ, निरर्थक व अपात्री होत आहे. याचा विनियोग विद्यादानाकडे केल्यास तो सत्पात्रीं होणार आहे. ज्या जातीचा इतिहास नाहीं, त्या जातीस कधींही उन्नतावस्था प्राप्त होणार नाहीं. ती हीन दशेलाच पोहचल्याचीं अनेक उदाहरणे आहेत. इतिहासाचा उपयोग जरी हल्ह्रीं झाल्याचे दिसून येणार नाहीं, तरी .