पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७ ] तो पुढील पिढीस चांगला उपयोगी पडणार आहे. परमेश्वरकृपेनें आपणांस दोन्ही गोष्टींची चांगली अनुकूलता आहे. तुमची जात ही अज्ञानावस्थेत असल्यामुळे तिची सुधारणा करण्याचे श्रेय आपण संपादन केल्यास तें कांहीं अनाठायीं होणार नाहीं." कै. रा. श्रीकृष्ण चिंतामण चिटणवीस वकील आणि कै. रा. गोपाळ छोटीराम तेल- पुरे गंवडी वकील यांनी मला असे सांगितले की, आपल्या एका जातीच्या गृहस्थावर एक दिवाणी मुकद्दमा झाला होता; त्या मुकद्दम्यांत त्याची दोन वेळां एकाच कोर्टात जबानी झाली; त्या वेळी त्यानें दोन्ही वेळां आपली जात निरनिराळी अशी सांगितली. त्या प्रसंगी कोर्टात हंशा उडून त्याच्या विरुद्ध निकाल झाला. 66 कै. गोपाळराव गवंडी हे आमच्या ज्ञातींतील पहिलेच वकील होते; यांनी थोडक्याच दिवसांत आपल्या धंद्यामध्ये चांगला नांवलौकिक मिळविला होता. यांना आपल्या जातीचा मोठा अभिमान असे आणि तिची सुधारणा करण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते; यांनी मला असें झटले कीं, “आपण आपल्या आप्तांचें पालनपोषण करण्यांत आणि लग्नकार्यात हजारों रुपये खर्च केले आहेत; आणि करीतही आहांत. तसेच दीड दोन हजार रुपये गेले असे समजून जातीचा इतिहास तयार केल्यास आपलें एक चिरस्मरणीय स्मारकच होणार आहे. " मला आपल्या उद्योगधंद्यासंबंधानें आणि तीर्थयात्रेच्या निमित्तानें हिंदुस्थानांतील बहुतेक भागांत प्रवास करावा लागत असे. मी ज्या ज्या गांवीं जात असे त्या त्या गांवीं मला आपल्या जातीविषयीं चौकशी करण्याची मोठी हौस असे. माझ्या जातीचे लोक एकाच गांवांत राहतात; आणि त्यांच्यामध्ये अन्नव्यवहार आणि कन्याव्यवहार होत असतो; परंतु ते आपल्या जातीचीं नांवें मात्र निरनिराळी सांगतात; आणि इतर लोक त्यांना भलत्याच जातीचीं नांवें देतात. सूक्ष्मदृष्टीने आणि शोधकबुद्धीनें प्रश्न विचारल्यास ते त्यांचीं अज्ञानमूलक उत्तरें देतात. सिंव्हास कोल्हा नांव दिल्याने त्याची जशी विटंबना होते, तद्वत आह्मी खरे सिंह ( रजपूत) असून आमची कोल्ह्यांत (कुंभा- रांत) गणना होत आहे; यामुळे याचा परिणाम अत्यंत शोचनीय झाला असून पुढेही अधिक होणार आहे, अशी माझ्या मनाची पूर्ण खात्री झाली. आपल्या जातीचें मूळ ठिकाण, वंश, वर्ण, गोत्र, देवी, कुलाचार वगैरेसंबंधानें आज- पर्यंत कोणीच शोध करण्याचा प्रयत्न केला नाहीं. अंधपरंपरेप्रमाणे स्थिति चालत आली आहे. आमच्या जातीचा इतिहास लिहिणें हें जितकें कठीण आणि खर्चाचें काम आहे, त्यापेक्षां तें विशेष जोखमीचेंही आहे. ह्मणूनच आजपर्यंत ते करण्यास कोणी धजलें नाहीं. आमच्या जातीची सत्य, साग्र व विश्वसनीय माहिती मिळविण्यासाठीं मी मोठमोठ्या बक्षिसांच्या जाहिराती हिंदुस्थानांतील बहुतेक इंग्रजी, मराठी, गुजराथी