पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. जे जे कांही आपणांस ठावें । तें तें हळू हळू शिकवावें ॥ शहाणे करून सोडावे ॥ सकल जन ॥ १ ॥ —श्रीरामदास. प्रस्तुत ग्रंथ लिहिण्याकडे माझ्या मनाची प्रवृत्ति होण्यास कसकसे प्रसंग येत गेले त्याचें येथें प्रथम दिग्दर्शन केले असतां या ग्रंथाचें महत्व, उपयुक्तता व आवश्यकता किती मोठी आहे, ती चांगली दिसून येणार आहे. माझा शाळेतील आवडता विषय झटला ह्मणजे इतिहास हा होय; त्यामुळे मला लहानपणापासूनच इतिहास, पुराण व चरित्रे वाचण्याचा मोठा नाद असे, आणि मी आपली रिकामपणची बहुतेक वेळ ह्याच विषयांवरील पुस्तकें वाचण्यामध्ये घालवीत असें. त्यामुळे अर्थातच माझ्या मनांत आपल्या जातीसंबंधी माहिती समजून घेण्याची विशेष जिज्ञासा उत्पन्न होणे हे अगदीं स्वाभाविक आहे. ब्राह्मणेतर ज्ञातींपैकीं, बऱ्याच लोकांची आपली जात सांगण्याची अशी एक साधारण वहिवाट पडून गेली आहे की, त्यांच्यामध्ये जे कोणी नामांकित पुरुष होऊन गेले किंवा सध्या आहेत, त्यांच्या जातीचे आह्मी आहोत, असे सांगत असतात. तद्वतच आमच्या जातींत ज्यांनी उत्तम लौकिक संपादन केला आहे असे कै० श्री. नंदरामजी सुंदरजी कवलये नाईक आणि कै० श्री. रा. ब. भाऊ- साहेब मनसारामजी धवारे नाईक यांच्या जातीचे आह्मी आहोत, असे आमचे जातबंधु सांगत असतात. मी सन १८७९ साली, कै० नंदरामजी नाईक यांना भेटण्यास गेलो होतो, त्यावेळी मी त्यांना " आपली जात ही कोणत्या वर्णाची आहे ? तिचें खरें नांव काय ? आपले मूळ ठिकाण कोणतें ? " वगैरे अनेक प्रश्न विचारले. तेव्हां त्यांनी मला असे उत्तर दिलें कीं, 'आपल्या जातीसंबंधानें अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे आपल्या जातींत आपणच पहिले आहांत; आणि या गोष्टीचा मला परम संतोष वाटत आहे; इतकेंच नाहीं, पण मोठे कौतुक वाटत आहे. माझे वडील मला असे नेहमीं सांगत होते कीं, आपण क्षत्रि- यवर्णाचे आहोत. आपला मूळ देश राजपुताना हा आहे. क्षत्रियांना पुढे रजपूत म्हण.. ण्याचा प्रघात पडला. आपणांस कुमावत असे म्हणतात, त्याचा पुढे अपभ्रंश कुंभार असा झाला आहे. पण आपण कुंभाराचें कर्म आजपर्यंत कधीही केले नाहीं. आपण गवंडी काम करीत असल्यामुळे आपली जात गवंडी या नांवानें प्रसिद्धीस आली आहे;