पान:आपले आभाळ पेलताना.pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 बाईचे सारे आयुष्य ३ वाराच्या ओढणीत बांधलेले. चार दिशा सुद्धा ओढणीच्या घुंगटातून दिसणार. घुंगटातली घूटन...... गुदमर बाईच्याच वाट्याला.

कोठरीके चार कोने
हर दो कोने बीच दिवार... sss

दिवार बना है घूंगट
घूंगट भीतर घूटन
घूटन भरी है जिंदगी - .....sss

ओढनी है जिंदगी
जिंदगी है ओढनी
ओढनी .... जिंदगी .....sss


हे गीत गातांना प्रत्येक कडव्यानंतर अत्यन्त उदास .. करुण स्वरातले उकार असत. गाता गाता नंदाचे डोळे वाहायला लागत. एवढे वाईट वाटतें, दुःख होतें तर कशाला हे गाणे म्हणायचे ?, असे मी म्हणताच मला नंदाने उत्तर दिले होते, "भाभी, हे गाणं म्हणताना विहिरीला पाण्याचे फुटवे फुटतात ना तसे डोळ्यातून पाणी वाहाते. पण त्यामुळे मन खूप शांत होते. काही नवे करण्याची इच्छा पण जागी होते."

 आजही खिचडी करताना मम्मीला नंदा आठवतेच. तिच्या खिचडीत वांगी नि बटाटे असणारच. कढीसाठी पीठ दळून आणताना त्यात पसाभर उडीददाणे नि वाटीभर धणे भाजून घालणारच. शिवाय फोडणीत चार मेथीदाणे टाकायला तिनेच नकळत शिकविले.

 नंदा दिलासात असतांनाच जीवनधरचे पत्र आले. पहिल्या वाक्यातच "आय लव्ह यू, डू यू लव्ह मी ?" असा प्रश्न होता. नंदाची समजूत घालण्याचा त्यात प्रयत्न होता.. दुसरी बाई सोडून गेली होती. मुलाला भेटण्याची आग्रही विनंती पत्रात होती. पण त्यातील एकाही अक्षराने नंदा विचलित झाली नाही. ती म्हणे की मी गेली ८ वर्षे या थापांना भुलले. जिवावर दगड ठेवून, मुलांच्या भल्यासाठी घराबाहेर पडले. त्याला यायचेच असेल तर

आपले आभाळ पेलताना/९०