पान:आपले आभाळ पेलताना.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिची बाजू उचलून धरली. वडिलांनी जावयाला पत्र पाठवून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. नंदाच्या भावाला त्याला आणण्यासाठी सुरतेला पाठवले. पण जावयाला पैशाची धुंदी चढली होती. तो दुसऱ्या लग्नाची भाषा अधिक जोरात बोलू लागला.

 नंदा सातवीपर्यंत शिकली होती. समज चांगली होती. स्वत:च्या पायावर उभे राहून मुलांना शिक्षण द्यावे असे तिला मनापासून वाटे. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारागिरांबद्दल तिला सहानुभूती वाटे. ती म्हणे, हिऱ्याला पैलू पाडणाऱ्याला पैसा भरपूर मिळतो. पण त्या माणसाचे डोळे अर्ध्या वयातच निकामी होतात. ऐन चाळिशीत अनेकजणांना धंद्यातून बाहेर पडावे लागते. पैसा आला की बारा वाटांनी निघून जातो. वाईट सवयी पैशाच्या नावाने लागतात. मग त्यांच्या मुलांनाही तरुण वयात शिक्षण सोडून वडिलांच्या धंद्यात पडावे लागते. तिला आपल्या मुलांना या धंद्यापासून दूर ठेवायचे होते.

 धुळ्यात आल्यावर विजयाताई चौकांबद्दल तिने ऐकले. ती त्यांना भेटली. त्यांना सहकार्य करणाऱ्या वकील ताईंना ती भेटली. वडिलांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे जीवनधर एकदा धुळ्याला गेला. पण त्याला दुसरीशी लग्न करायचे होते. नंदाने घटस्फोटाला मान्यता दिली तरच तो मुलांच्या नावाने दोन पाच हजार बॅंकेत ठेवणार होता. अर्थात नंदाने व तिच्या भावाने त्याला नकार दिला. पाचसहा महिने धुळ्यात माहेरी काढल्यावर नंदाही खूप अस्वस्थ झाली. तिची अडचण सामाजिक आणि मानसिक होती. भोवताली व्यापाऱ्यांची वस्ती. स्त्रियांना पुढच्या बैठकीत येण्याची परवानगी नसे. बहुदा तिथे दुकान थाटलेले असे. तिथे जाण्याचा प्रसंग दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने येणार. सुनांना तर हातभर घुंगट काढून तिथे जाता येई. लेकींची बात मात्र न्यारी. त्यांना कुठेही प्रवेश असे. त्याही सठीमासी चार दिवस येत. माहेरी मनभरुन श्वास घेऊन परत सासरी जात. तर असे हे भोवताली वातावरण. घरातल्या स्त्रियांना मोकळेपणी जाता येण्यासारखे ठिकाण म्हणजे हनुमान मंदिर. घरात भांडयाला भांडे लागून आवाज होणारच. असे आवाज झाले की सासवा नाहीतर सुना नंदाच्या आईकडे येत. निमित मंदिरात जाण्याचे. तिथे चार घरच्या चार जणी जमत. गप्पा रंगत. अर्थात गप्पा घराच्या चौकटीतल्या. हिने हे केले, तिने ते केले. ही अशी, ती तशी, कुणाचे सासरी पटत नाही, कुणाच्या नवऱ्याचं लफडं कुठे आहे वगैरे..वगैरे. अशा वातावरणात नंदा माहेरी चार महिने राहाताच, आडून विचारणे सरू झाले. "इता दिन क्यान रख्या ससुरालवालोंने ?.. ठिक

आपले आभाळ पेलताना/८८