पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साड्या, डोक्याच्या पिना, बांगड्या यांची खैरात तरी. वयाच्या सोळाव्या वर्षाच नंदा आई झाली. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षात दोन मुली नि धाकट्या केतनला जन्म दिला.

 दर बाळंतपणात शरीर थकत गेले. लहान मुलांकडे लक्ष देण्यात आणि घरकामात ती एवढी अडकून जाई की नटण्यामुरडण्याकडे लक्ष द्यायला वेळच उरत नसे. घर आणि मुलं यांची देखभाल करण्यात जीव इतका गळून.. थकून जाई. मग जीवनधरच्या हौशीमौजीत सहभागी होण्याचा उत्साह येणार तरी कुठून ? - मग चिडचिड, रुसवेफुगवे, रडारड, भांडणे. त्यातूनच हाणामारी सुरु झाली. जीवनधरला पते आणि दारुची चटक लागली. तो शुद्धीवर असाला को नीट वागत असे. पण अशी वेळ कमीच, नंदाची मोठी जाऊ म्हणजे तिची सख्खी मोठी बहीण. तिच्या नवऱ्याने धाकट्या भावाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. वेगळे घर केले तर संसाराची जबाबदारी उचलावी लागेल आणि मग घरात गुंतेलं. बाकीचे नाद आपोआप कमी होतील असे वाटले. पाण वेगळे घर केल्यापासून नंदाचे हाल अधिकच वाढले. जुगाराबरोबर दुसराही नाद लागला. घरातले दागिने नाहीसे होऊ लागले. जीवनधर घटस्फोटाची भाषा बोलू लागला. नंदाने राजीखुशीने सही न दिली तर मुलांसह नंदाला मारुन टाकण्याचे बेत तो बोलू लागला. स्वत:च्या मुलांच्या जीवाला धोका पत्करण्याची तयारी कोणती आई दाखवेल ? नंदाच्याच भाषेत सांगायचे तर ते असे.

 "अपने पतीको वेश्याके घर तक सन्मानसे ले जाने वाली पतिव्रता या अपने लाडले बेटे को मारकर उसकी सागुती अतिथीके लिये बनानेवाली आदर्श गृहिणी पौराणिक किताबोंमेही होती है... स्वत:च्या नवऱ्याला वेश्येच्या दारात नेऊन घालणारी पतिव्रता पत्नी आणि अतिथीला पोटच्या लेकरांची भाजी करुन खाऊ घालणारी आदर्श गृहिणी पुराणातल्या गोष्टीतच भेटतात. त्या 'माणूस' नसतातच. पण माणसाचे शरीर धारण करणाऱ्या आम्ही. त्यांनी कसे अनुकरण करायचे ? नि का करायचे?"

 नंदा व तिच्या बहिणीने विचारपूर्वक निर्णय घेतला. मोठ्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी बहिणीने घेतली. धाकटा केतन आणि मधली वैशाली यांना घेऊन नंदा धुळ्याला आली. नंदाने नवऱ्याचे घर सोडून कायमचे माहेरी येणे वडिलांना पटले नाही. परंतु भाऊ आणि आई यांनी

आपले आभाळ पेलताना/८७