Jump to content

पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
तीन गज की ओढनी....


 वयाची पन्नाशी उलटून गेली तरी माहेरच्या दिशेने ओढ घेणारे मन कधीच वयस्क होत नाही. आईवडिलांच्या निर्व्याज प्रेमाची शाल.. त्यांचा सहवास पन्नाशी उलटेपर्यंत लाभला. तर, माथ्यावरचे केस चंदेरी झाले तरी अंगभर बालपण हुंदडत राहाते. मी त्या बाबतीत भाग्याची. कालपरवापर्यंत आई-पपा होते. त्यांना भेटायला धुळ्याला जाताना, तिरवीच्या तलावाभोवतालचा हिरवा डोंगर लागला की माझे मन थेट घराच्या पायऱ्या चढत असे. भर उन्हाळ्यातही खानदेशी गरम वारे तनामनातला वसंत फुलवीत. आई खूप आजारी होती. मी पळतच तिथे पोचले. चार दिवस निवांतपणे राहिलं. माता माहेरी गेले बने बाजारात भटकणे आलेच. बॉम्बे कटपीस सेंटर हे आमचे गेल्या २०/२५ वर्षांपासूनचे लाडके दुकान. तिथे जाऊन तऱ्हेतऱ्हेच्या कापडाचे तुकडे सरकवण्यात नि त्यातून हवे ते तुकडे निवडण्यात दोन तास दहा मिनिटांगत अपुरे पडत. त्याही दिवशी पाय त्या दुकानाकडे वळले. पण दुकानाचा बाज आता पार बदलला होता. कटपीसचे दुकान - एका तुकड्यात वसवले होते आणि उरलेल्या मोठया भागात तयार कपड्यांचा देखणा विभाग थाटाता उभा होता. सुरेख झगे दिसाले म्हणून आत शिरले. एक झगा न्याहाळते आहे तोच खूप आनंदाने रसरसलेली हाक ऐकू आली. 'भाभी !! दीदी !! तुमी ? कवा मालात ?..' माहेरच्या अंगणात मला भाभी म्हणणारी कोण असा विचार करीत आवाजाच्या दिशेने नजर टाकली तर काजळभरल्या डोळ्यांची टवटवीत नंदा मला हाक देत होती. काही उमजायच्या आत धावत येऊन कडकडून भेटलीही नि तेवढ्या गर्दीत 'पाँव लागू' ही झाले. मग अंबाजोगाईतील सर्वांची खुशाली विचारली. नंदाच्या आवाजातला नम्र गोडवा खूप खूप दिवसांनी ऐकायला मिळत होता. तोच गोडवा दुकानाच्या मालकांना विचारीत होता.

 'पिताजी, या भाभी, माझ्या दीदी पण, अंबाजोगाईतल्या भाभी. यांच्याच संस्थेत मी शिवण, भरतकाम, पिको..फॉल लावायला शिकले. आपले वकील आहेत ना, प्रकाश भाऊ? त्यांची मोठी बहीण. मी त्यांना घरी नेऊन आणते. तासभर सुट्टी देता ? संध्याकाळी जास्त थांबेन ?' आता कोणते पिताजी या भावूक विनंतीला नकार देगार?

 सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. धुळ्याहून, तेथील महिला संस्थेस,

आपले आभाळ पेलताना/८५