पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(Macro) या दोन्ही स्तरांचा परस्पर अन्वय लावून पाहावे लागते.
 विशिष्ट काळातील स्त्रियांच्या समस्याचा वा ग्रामीण महिलांच्या समस्या असा कोणताही कालसापेक्ष वा परिसर सापेक्ष छेद घेतला तरी त्याच्या गाभ्यात विशिष्ट प्रकरणे आणि त्यात्या प्रकरणातील विशिष्टता असते. शिवाय शैलाताईसारख्या कार्यकर्त्या त्या संस्थांमध्ये काम करतात त्या संस्थांमध्ये येणाऱ्या मुलींचे माणूस म्हणून- व्यक्ति म्हणूनही काही प्रश्न असतात. नोकरशाहीच्या काटेकोर चौकटीत न अडकता कार्यकर्त्यांला येणाऱ्या मुलीशी संवाद साधावा लागतो. परिस्थितीने झोडपलेल्या अशा एखाद्या व्यक्तीशी वागताना संयम आणि सहानुभूती असावी लागते. पण केवळ भाबड्या मायेत वाहून न जाता, येणारे नवे माणूस खरे बोलते आहे का? तेही पारखून पहावे लागते. खंबीर राहूनही नैतिक वडिलपणाचा चष्मा चढवून चालत नाही. शैलाताईंनी या संग्रहातल्या लेखात प्रत्येक प्रकरणाच्या विशिष्टतेला स्थान दिले आहे. काहीवेळा विशिष्ट मुलगी संस्थेतून बाहेर जाते त्यावेळी तिच्या पुढच्या आयुष्याची दिशा मान्य करतात.
 हे लेख आपण वाचक म्हणून वाचाल, तेव्हा त्यातल्या एकेका लेखाविषयी मी काहीच लिहित नाही. पण हे सारेच लेख वाचताना माझ्या मनात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याविषयी लिहिते. वाचकांनाही त्यांच्या प्रतिक्रिया पडताळून पहाता येतील, घर कुटुंब हे स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे असे नेहमी म्हटले जाते. पण हेच घरकुटुंब तिला गरज असेल तेव्हा आधार देत नाहीच. किंबहुना सतत त्या आधाराची किंमत मागते. मग ते घर वडिलांचे असो वा नवऱ्याचे-सासऱ्याचे असो. म्हणून तर दिलासा घराची वा परदेशातील 'Home for Battered Women' ची गरज भासते. काहीवेळा अशा प्रश्नांची चर्चा करू लागलो की समाजातील समंजस(?) चेहरा असणारे म्हणतात "असो या तर जुन्या गोष्टी........" हे खरं नाही हे आपल्याला शैलाताईंच्या अनुभवातून लक्षात येईल. पाचवर्षापूर्वी निघालेल्या परित्यक्तांच्या मोर्चातील सर्वात धाकटी सात वर्षाची होती आणि औरंगाबादला आयोजित केलेल्या परित्यक्ता परिषदेला इतकी गर्दी झाली की व्यवस्था कोलमडून पडली हे वास्तव आहे.
 या साऱ्या कहाण्यांच्या मुळाशी काय आहे याचा विचार केला तर लक्षात येईल की अशान, दारिद्रय, अंधश्रध्दा, जातीयता यांचा गुंता आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी किमान आर्थिक सांस्कृतिक सामुग्री नाही. मात्र जातीयता- अंधश्रध्दा यांनी दिलेले सांस्कृतिक अहंकार आहेत - गळ्याला आवळलेला दैववादाचा फास आहे! कोणत्याही नाडलेल्या वर्गाचा आपण विचार करतो तेव्हा त्यातील प्रत्येक व्यक्ती गुणवान आहे, बिनचूक आहे असा आपला दावा नसतोच मुळी. पण प्रश्न विचारणारे अनेक विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात त्यांना 'तसल्याच' गटात ढकलण्याचा प्रयत्न करतात. या लेखसंग्रहात शैलाताईंनी या मुलींवर होणाऱ्या अन्यायांची नोंद जशी केली आहे तशीच त्यांच्या तरूण