पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बरोबर एखादा नव्याने आलेल्या प्रकरणाची वा वर्तमानपत्रातल्या स्त्री अत्याचाराच्या बातमीची चर्चा करीत. सती प्रकरणाची चर्चा तर दोन तीन बुधवारी सतत रंगली. दररोज सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी बातम्या वाचून दाखवल्या जात. त्यावरही गप्पा होत. या साऱ्यातून निर्मला, कांता, हंसा...सगळ्याच स्वत: विचार करायला नि ते बोलायला शिकल्या. धीटही झाल्या. एकदिवस मला नगराध्यक्षांचा फोन आला.

 "भाभी, तुमच्या दिलासा घरातील बाया भेटायला आल्या होत्या. त्यांना बालवाडीत सेविका म्हणून नोकरी पाहिजे आहे. मी त्यांना म्हटलं की संस्थेत तुम्हाला जेवणखाण, कपडालता मिळतो, राहायची सोय आहे. शिवाय त्या सांगत होत्या की बँकेत शंभर रुपयेही भरतात. मी म्हणालो की सेविकेला मिळतात अवघे दोनशे रुपये. तुमचे त्यात कसे भागणार? तर एक म्हणाली की आम्हाला तिथे राहायचे नाही. तुमच्या कानावर घालावे म्हणून फोन केला. काय अडचण आहे त्यांना तिथे राहाण्यात ? तुम्ही म्हणालं तरं करतो विचार....." नगराध्यक्ष सांगत होते.

 या तिघी परस्पर जाऊन भेटल्या म्हणून मम्मी भयंकर चिडली. मोफत कायदा मदत, मोफत शिवण प्रशिक्षण, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पायावर उभे राहण्यासाठी उसनवार आर्थिक मदत आदी सोयी असताना, प्रशिक्षण पूर्ण करायचे सोडून यांना दोनशे रुपयांची नोकरी करण्याची हौस का आली हे आम्हालाही समजेना. मग त्यांच्याशी मोकळेपणी गप्पा मारल्या. त्यातून बरेच धागे उकलले. आम्हीही नवे शिकलो. दिलासा घरातील शिस्त त्यांना कधी कधी नकोशी वाटे. 'घरा'चा ऐसपैस मोकळेपणा त्यांना मिळत नसे.

 "मम्मी लईच कड़कड करती नि धाक घालती. एकादिवशी जरा उशीर झाला उठायला तर काय होतं? रविवारी बी फाटेच उठायचं का? " एकीची तक्रार.

 "भाभी आपल्या दिलासा घरात फक्त सहा जणींना आधार द्यायची सोय आहे. आता आमी आठ जणी आहोत. मग अडचणीत असलेल्या बायांची कशी सोय व्हावी ? म्हणून मीच नेलं सगळ्यांना मुनशीपालटीत. विवेकसिंधूत जाहिरात वाचली होती. म्हटलं तिघीजणींना नोकरी मिळाली तर, एकत्र राहून. घरून थोडीफार मदत घेऊ. पण स्वतंत्रपणे राहू. एकत्र

आपले आभाळ पेलतांना/५७